खरंतर कामवासनेवर लिहिण्याची गरजच काय? कुणी लिहिलं तर तो बदमाश ठरतो.मात्र जेव्हा एखादा व्यक्ती मनाचा आत डोकावून लागतो, तेव्हा कामवासने पुढे, आपण किती हतबल आहोत, हे कळतेय. खरा प्रश्न असा की या भावनेचे दमण करायचे की त्या भावनेचा स्वीकार करीत पुढे जायचे..! पुढे कसे जायचे याचे सद्यातरी उत्तर माझ्याकडे नाही. मात्र या भावनेचे दमन करणे म्हणजे त्या भावनेची अधिक तीव्रता वाढविण्यासारखे होईल.दुसरं असं.. अनेकांना या भावनेवर ताबा मिळवीता येत नाही.. परिणामी त्यांचे वैवाहिक आयुष्य दुःखमय होऊन जाते.. शंकेने घेरले जाते.. अशी माणसे वरवर हसमुख दिसत असली तरी आतून तुटलेली असतात..
एखाद्याने कामभावनेचे महत्व आवर्जून सांगितले आणि त्या भावनेचे अनैसर्गिक दमन करण्याला विरोध केला, तर तो अनितीमान आहे, असे म्हणणे उचित नव्हे. बट्राड रसेल
कामपुर्ती ही शरीरधारणेला कारणीभूत होत असल्यामुळे ती आहारासारखी आहे. शिवाय, धर्म व अर्थ यांचे फळही कामपूर्ती हेच आहे, वात्स्यायन
वासना कश्याचीही असो.. जेव्हा ती सैरभैर पळू लागतेय.. तेव्हा मनाचा ताबा सुटतो... एकदा मनाचा ताबा सुटला की,छोट्या छोट्या गोष्टीमुळे माणूस विचलित होत असते...स्वामी विवेकानंद यांनी म्हटलं, बाहेरील जग तुम्हाला 50 टक्के दुःखी करू शकते..हे दुःख ठरलेलंच या दुखावर कुठलाच उपाय नाही.याचा दुसरा अर्थ असा की, 50 टक्के तुम्ही आनंदित असू शकता... कारण हे तुम्हचा हातात आहे.. हा आनंद कुणीच हिरावू शकत नाही.. मात्र तेव्हा जेव्हा तुम्ही जागरूक असाल...कोण काय बोलला.. हे गेलं.. ते गेलं... हे असतं.. ते असतं... भूतकाळ आणि भविष्यकाळात जगणारा माणूस आनंदित राहू शकत नाही... वर्तमानकाळात जगणारा आनंदित राहू शकतो आणि आलेल्या अडचणीवर मात करू शकतो.. श्वास आत..श्वास बाहेर हा वर्तमान आहे...
खरंतर वात्स्यायनाने म्हटलं त्यात चुकलं काय? अगदी सोप्या भाषेत त्यांनी सांगितलं आहे.. जस आपण अन्न सहजरीत्या घेतो, तशी ही भावना आहे...सहज... मात्र सहज गोष्टच फार कठीण असते.. ही भावना सहज आहे..जेव्हा ही भावना एका व्यक्तीबद्दल असते..भावना एकनिष्ठ असते..तेव्हा या भावनेचा उद्रेक होत नसते... दोघांचाही भावना गुंतत जातात... येथे दमन करण्याची गरजच उरत नाही.. आसक्तीकडुन हळुहळु आपले पाऊल मुक्तीचा मार्गकडे जात असते...संसार म्हणजे मोहमाया, असे आपले ग्रंथ सांगतात..पण संसारात पडल्याशिवाय यातून मुक्तता नाही... मुक्त होणे म्हणजे कुटुंबियांना सोडून, सन्याशी बनने नाही.. संसारात राहूनही, त्याला चिकटून बसने नाही.. याला मध्यममार्ग म्हणता येईल..किवा समतोलपणा म्हणता येईल...हे ज्यांने साधलं त्याचे मन लख्ख प्रकाशात उजळून निघालं...स्वामी विवेकानंदाचा आयुष्यातील एक घटना.. त्यांचे कुटुंबिय कर्जबाजारी झाले..याचा फारच त्रास विवेकानंदाना झाला.. असं म्हणतात की पैश्याचे सोंग घेता येत नाही..विवेकानंद रामकृष्णाकडे गेले.. त्यांनी नाराजीचा सुरात म्हटले, मी एवढ्या संकटात आहे..माता का धावून येत नाही..रामकृष्ण म्हणालेत, मला विचारण्यापेक्षा मातेला विचार..विवेकानंद चार ते पाच वेळा मातेकडे गेले.. पण त्यांनी काहीच मागितलं नाही.. ते जेव्हा जेव्हा गेले, तेव्हा तेव्हा ते अधिक शांत होवून बाहेर आलेत... एकदा मनाचा दीप पेटला की.. त्या उजेळात जीवनातील क्षणभंगुरतेचे दर्शन होत असते..
nz


0 टिप्पण्या