बुद्ध स्तूप.. आज बौध्दांचे पवित्र स्थळ बनले आहे. जिथे बुद्ध आणि बुद्ध धम्माशी निगळीत महत्त्वाच्या व्यक्तिच्या शारीरिक अवशेष ठेवले जाते. जसे शरीर जळल्यावरची हाडे, राख. आज आपण ज्याला स्तूप म्हणतो त्या स्तूपाला तथागतांचा जन्म व्हायचा आधी दफनभूमी म्हटल्या जायचे.खरंतर ही बुद्धकालीन, किवा सम्राट अशोककालीन रचना नाही. त्याही हजारो वर्षांपूर्वीची रचना आहे.स्तूप म्हणजे समाधीस्थळ.आपल्या पूर्वज्यांची ही देणं आहे. त्याकाळात गोलाकार आकारात दगडावर दगड रचून ही समाधी केल्या जायची. तिथे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा देह, त्याचा अस्थी, राख,आवडत्या वस्तू ठेवल्या जायचा. ही दगडी रचना येणाऱ्या पिढीनी त्यात काही बद्दल करून पुढे चालविली. बुद्धाचा परिनिर्वानानंतर ज्या स्तूपाची निर्मिती झाली, ते स्तूप अशोक काळातील स्तूपा प्रमाणे देखणे नव्हते.गोलाकार आकारातील माती आणि दगडाचा ढीग त्याला आपण म्हणू.सम्राट अशोकानी याला देखणे रूप मिळवून दिले. अशोका नंतरच्या बौद्ध राजांनी यात अधिक सुधारणा करीत त्याला अधिक देखणे रूप बहाल केले.
आता मूळ विषय असा गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव.. या गावाला लागून असलेल्या डोंगरावर राक्षक ओटा असल्याची माहिती मला मिळाली. हा ओठा बघण्यासाठी जेव्हा मी डोंगर सर केला तेव्हा त्या हॉटेलला बघून प्रथमदर्शी मला वाटलं हा फारच प्राचीन बुद्ध स्तूप असावा..माध्यमाशी बोलताना मी बुद्ध स्तूप असल्याचे बोललो.. मात्र तो राक्षक ओटा अश्मयुगीन काळातील समाधी होती. अशी समाधी चंद्रपूरच नव्हे महाराष्ट्रात नाही. असं असताना पुरातत्व विभागाने याकडे लक्षचं दिलं नाही.आज त्याकाळातील इतिहास त्या समाधीत दफन आहे.


0 टिप्पण्या