भंगारचोरांचे धाडस,महावितरणच्या बंद पडलेल्या वाहिन्यांवर मारला डल्ला, धाबा पोलिसांची मोठी कार्यवाही

 


चक्क गॅस कटर , वाहन आणि संपूर्ण साहित्य घेऊन विजेचे खांब आणि अल्युमिनियम तारांची कापून करत होते चोरी

गोंडपिपरी 

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात भंगारचोरांचे अनोखे धाडस बघायला मिळाले. या परिसरात सोमनपल्ली ते धाबा जाणाऱ्या मार्गावर बंद पडलेली एक महावितरण डीपी कापून चोरून नेल्याची तक्रार धाबा पोलीस ठाण्यात प्राप्त झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गस्त वाढविली होती. या दरम्यान एक बोलेरो वाहन संशयास्पद रीतीने फिरताना पोलिसांना आढळले. वाहनाची झडती आणि सोबतच्या इसमांची विचारपूस केली असता ते  महावितरणच्या बंद पडलेल्या वाहिन्या विविध साहित्याने कापून लंपास करत असल्याचे उघड झाले. साहित्यात चक्क गॅस कटर , ग्लोव्हज, घरगुती सिलिंडर, ऑक्सिजन सिलिंडर आदींचा समावेश होता. हे संपूर्ण साहित्य घेऊन चोरटे विजेचे खांब आणि अल्युमिनियम तारांची चोरी करत होते. पोलीसांनी चंद्रपूर शहरातील मोहम्मद वहाब आणि जमील शेख या भंगार दुकान चालविणाऱ्या आरोपींना 10 लाखांच्या मुद्देमालासह अटक केली  आहे.ही कार्यवाही धाबा उप पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुबोध वंजारी यांनी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या