शेतात वाघीण, बछडे! सांगडे म्हणाले बंदोबस्त करा! शेतकऱ्यात दहशत




धाबा 


एकीकडे पावसाने दडी मारल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. डोळ्यासमोर पीक करपताना बघून हिंमत हारलेल्या बळीराजापुढे आता नवे संकट उभे झाले आहे. थेट शेतात वाघोबा येत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान माजी सरपंच नामदेव सांगडे यांनी वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.


धाबा, डोंगरगाव परिसरातील बहुतांश शेती जंगलाला लागून आहे. वन्यजीवांचा मोठा त्रास या भागात असतो. काही दिवसापासून या भागात वाघीण आणि तिच्या पिल्यांचे दर्शन होऊ लागले. थेट शेतात पगमार्क दिसू लागले आहेत. मिथलेश्वर झाडे यांच्या शेतापर्यंत वाघीण येऊन पोहचली आहे. अनिल डोंगरे यांना वाघीणचे पगमार्क आढळून आले आहेत. देवाजी झाडे, दयाशंकर झाडे, कोंडू चंदनगिरी आणि हिवरा गावाकडे जाणाऱ्या कालव्यात मोठ्या प्रमाणात पगमार्क दिसत आहे.धाबा-किरमीरी मार्गांवरील शेत शिवारात पगमार्क आढळले आहेत. तशी माहिती नामदेव सांगडे यांनी दिली. वाघिणीची हालचाल वाढल्याने शेतकऱ्यात दहशत पसरली आहे. दरम्यान नामदेव सांगडे यांनी वाघिणीचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने