'त्या' सात शेतकऱ्यांचा सर्व्हे नंबर गायब, ई पीक पाहणी अडली


 


धाबा 


ई पीक पाहणी ॲपमध्ये धाबा गावातील सात शेतकऱ्यांचा शेतीचा सर्व्हे नंबर उपलब्ध नसल्याने त्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी अडली आहे . महसूल विभागाकडे शेतकऱ्यांनी आपली समस्या निवेदनातून मांडली. मात्र अद्यापही त्यांचा शेतीचा सर्व्हे नंबर उपलब्ध झालेला नाही.अशोक झाडे, रमेश ठुसे, माधव आवारी, रुपेश झाडे, माया घोगरे, दीपक टेकाम, पोछना बोरकुंटावर अशी शेतकऱ्यांची नावे आहेत. या शेतकऱ्यांची शेती सर्व्हे नंबर 127 मध्ये आहे.

ई-पीक पाहणी ही महाराष्ट्र शासनाची ऑनलाइन प्रणाली आहे. ज्या द्वारे शेतात कोणते पीक घेतले आहे, किती क्षेत्रावर घेतले आहे आणि पिकाचा फोटो याची माहिती शासनाच्या ऑनलाइन प्रणालीमध्ये स्वतःच्या मोबाईलद्वारे नोंदवण्याची डिजिटल पद्धत होय.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने