तरुणाची आत्महत्या, कुणालाच गांभीर्य नाही




राजकारणाचा कुजलेला, विद्रूप चेहरा गोंडपिपरी तालुक्यातून पुढे आला आहे. भंगाराम तळोधी येथील एका राजकीय नेत्याने तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाण त्याला सहन झाले नाही. त्याने आत्महत्या केली. मारहाण करणारा नेता देश्यात असलेल्या मुख्य विरोधी पक्षातील आहे.कदाचित त्यामुळे त्याच्यावर अद्यापही कार्यवाही झालेली नाही. सत्तेत असलेल्या पक्ष्याने आवाज उठवीला नाही, ही शोकांतिका.तालुक्यात सुरु असलेल्या चर्चेनुसार पोलिसांनी तक्रार सुद्धा घेतली नाही, असे बोलले जात होते. गोंडपिपरी पोलिसांशी संपर्क केला असता. मर्ग दाखल झाला असून चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


हे कसले नेते....


खरंतर राजकारण समाजसेवेचे प्रभावी साधन आहे. आता चित्र बदलले आहे. कुणी आपले अवैध धंदे, ठेकेदारी वाचवायला येतो तर कुणी आपली ताकद वाढविण्यासाठी. कुणी राजा होण्यासाठी.यांना जनतेचे दुःख काय कळणार ? कदाचित तो तरुण चुकला असेलही म्हणून ढोरासारखं मारायचे... इतके मारायचे त्याचा मनात आत्महत्येचा विचार यावा. समाजसेवेचा हा कुठला चेहरा आहे ? नोकरशाहीने सुद्धा असे प्रकरण फारच गंभीरतेने हाताळायला हवे. एखादी निर्जीव वस्तू तुटून खाली पडलेली नाही. जीव गेला आहे. कुणाचा तरी मुलगा, भाऊ हरवीला आहे, कायमचा. याचे भान ठेवावे

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या