एकीकडे काँग्रेसचे राहुल गांधी तरुणांचा प्रश्नासाठी सत्ताधार्यांचा विरोधात उभे होत आहेत. दुसरीकडे त्याच काँग्रेसच्या नेत्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. वेदना असय्य झाल्याने तरुणाने जीवन संपविल्याची संतापजनक घटना गोंडपिपरी तालुक्यात घडली. विशेष म्हणजे या नेत्याला अद्यापही पोलिसांनी ताब्यात घेतलेले नाही. केवळ काँग्रेसच नाही तर सत्ताधारी पक्षातील नेते या राक्षशी नेत्याला वाचवीण्याचा प्रयत्न करीत आहेत काय? असं चित्र सद्या निर्माण झाले आहे.
विनोद हा तरुण गोंडपिपरी तालुक्यातील अडेगाव येथील रहिवाशी आहे. भंगाराम तळोधी येथील बिअर बारमध्ये तो मॅनेजर पदावर कार्यरत होता.हा बार काँग्रेस नेत्याचा आहे.मिळालेल्या माहितीनुसार 22 जुलैच्या रात्री 9 वाजताचा दरम्यान हिशोबाचा वादातून बारमालक आणि त्याचा भावाने विनोद याला मारहाण केली. त्याला रात्रभर बारमध्ये कोंडून ठेवले, असा आरोप कुटुंबियांचा आहे.या घटनेने हादरलेल्या विनोदने 23 जुलैला घरात असलेली विषारी फवारणीचे औषध प्राशन केले. यात त्याचा मृत्यू झाला.कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार विषप्राशन केल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी विनोद शुद्धीत होता.त्याने नातेवाईकांना घडलेली संपूर्ण घटना सांगितली.विनोद याचा बहिणीने गोंडपिपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेली असता तक्रार स्वीकारण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
पोलिसा विरोधात रोष..
या प्रकरणात गोंडपिपरी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. पोलिसा विरोधात गावकऱ्यात कमालीचा रोष बघण्यात आला.पोलिसांना जाब विचाराण्यासाठी गावकरी गोळा झाल्याची माहिती आहे. दरम्यान पोलिसांनी काही गावकऱ्यावर गुन्हे दाखल केल्याची माहिती आहे.दरम्यान गोंडपिपरी पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही.

0 टिप्पण्या