श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान संस्थेची सलग दुसरी सभा पोलीस स्वराक्षणात पार पडली. यामुळे संस्थेचे विश्वस्त नरसीमलू अण्णा चेपूरवार यांनी अध्यक्ष, सचिव आणि पदाधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या सभेत गुंड कोण आहेत, ज्यामुळे तुम्हाला पोलिसांना पाचारण करावे लागले, ते सांगा. मंदिराचा सभेत पोलीस पोलीस संरक्षणाची गरज काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थितीत केला. यावर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे काहीच उत्तर नव्हते.
दोन राज्यातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान संस्थेची पहिली आणि दुसरी विशेष सभा चर्चेचा विषय ठरली आहे. या सभेसाठी संस्थांनने चक्क पोलीस सुरक्षा मागवीली . या आधी असं कधीच घडलं नव्हतं.नेमकं आता काय घडलं ? संस्थेचे अध्यक्ष, सचिव बोलायला तयार नाहीत. विश्वस्त तोंडात जे आलं ते बोलतात. याचा अर्थ भाविकांना अद्याप कळलं नाही. दरम्यान या संस्थेत फार मोठा घोळ झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही संस्था रद्द करण्यासाठी शेकडो भाविकांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. तसेच मंदिर सुद्धा ताब्यात घेण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. योगायोगाने तसं झालं तर संस्था आणि मंदिर दोन्ही सुरक्षित राहतील असे बोलले जात आहे.

0 टिप्पण्या