गोंडपिपरी तालुक्यातील बहुतांश कामे भाजपच्या कार्यकर्त्यांनी मिळविले आहेत.थेट नाही, मुख्य कंत्राटदार वेगळाच, संस्था वेगळी, आणि काम करणारे वेगळे, असं चित्र आहे.यात कोण कुणाचा हे कळायला मार्ग नाही, मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांचा चेहरा नेहमी पुढे असतो.ही साखळी कशी जुळली हे कळायला मार्ग नाही. असाच एक चेहरा गोंडपिपरी तालुक्यातून पुढे आला आहे. त्याला ' मुरली ' म्हणतात. याच्यावर पाटबंधारे विभागाचे विशेष प्रेम दिसून येते. या विभागातील बहुतांश कामे ' मुरली ' च्या पदरात पडत असतात. हा मुरली ही कामे भाजप कार्यकर्त्यांना किवा पदाधिकाऱ्यांना देत असतो. कामाचा दर्जा बद्दल काय बोलायचे! काम सुरु असताना आणि काम पूर्ण झाले तरी तक्रारी कमी होताना दिसत नाही. कुणी तक्रार केलीच तर भाजप कार्यकर्ते त्याची लायकी काढतात, त्याच्यावर दबाव टाकतात. तक्रार कितीही करा, मुरलीचे काही वाकडं होत नाही. अशी एक चर्चा आहे, राजुरा विधानसभा क्षेत्रातील ' दादा ' मुरलीचा पाठीशी आहे. हाच दादा गोंडपिपरी तालुक्याला औद्योगिक क्षेत्र करण्यासाठी फारच आतुर झालेला आहे.
तर मुरलीने गोंडपिपरी तालुक्यात केलेल्या कामाचा दर्जा बघितला तर फारच कमकुवत आहे. शेतीला पाणी पुरविणाऱ्या कालव्याचे काम असो, या कालव्यावरील पुलाचे काम असो, मुरलीने केले. ( भाजप कार्यकर्त्याचा माध्यमातून ) बळीराजा कामाचा दर्जावर ओरडला. पण कुणी ऐकले नाही. सत्ताधारी सोबत असल्याने मुरलीची ताकद वाढली. वरून मुरली ' दादा ' च्या सासुरवाडीतला ( गोंडपिपरी तालुक्यातील ). दादा सोबत असल्यावर कोण काय बोलणार ? आम्हाला तेल वाचवीण्याचा सल्ला देणाऱ्यांनी लाखो, करोडो रुपयाचा चुराडा मुरली सारखे असंख्य ठेकेदार करीत आहेत, त्याकडे तक्रार करूनही प्रशासन लक्ष का देत नाही, याकडे दादा का बघत नाही? की दादाचेही हात यात ओले झाले आहेत. तसेही दादावर करोडो रुपयाचा अपहार केल्याचा आरोप आहेचचं. पण दादा आता तुम्ही लाखो लोकांचे नेतृत्व करता, याचा विसर होऊ देऊ नका, एवढी विनंती...! मुरली सारखे लोक तुमच्या नावाचा आधार घेतात आणि तुम्हालाच बदनाम करून सोडतात. दुदैव असे, यात तुम्हचे कार्यकर्ते सुद्धा असतात.
निलेश झाडे

0 टिप्पण्या