श्री संत परमहंस कोंडय्या महाराज संस्थान धाबाच्या वतीने श्रावण मासात महिनाभर चाललेल्या सहस्त्र बिलवार्चन सोहळा समाप्ती, रुद्र महापूजा, आरोग्य शिबिरराचे आयोजन करण्यात आले आहे .बबन पत्तीवार, शारदा पत्तीवार यांचाकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
9 सप्टेंबर 2026 रोज बुधवारला कोंडय्या महाराज संस्थानने या सोहळ्याचे आयोजन केले असून सकाळी सात वाजता अभिषेक व समाधी महापूजा होणार आहे.अकरा वाजता रुद्र महापूजा समाप्तीपर्व होणार आहे.
ज्यांनी महिनाभरात श्रावण मास पर्वावर महाअभिषेक केला होता, ते सर्व भाविक सहभागी होणार आहेत.
दुपारी बारा वाजता सत्य साई सेवा समिती चंद्रपूर द्वारा आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.रुग्ण तपासणी व औषधीचे वितरण केले जाणार आहे. संस्थांचे माजी अध्यक्ष बबनराव पत्तीवार,सौ. शारदा पत्तीवार यांचेकडून उपस्थित भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वांनी या मंगलमय सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन संस्थांचे अध्यक्ष सुहास माडूरवार,सचिव राजू चिलमंतवार व विश्वस्त मंडळाने केले आहे.
