चंद्रपूर
शुक्रवारला संध्याकाळी शेतात काम करायला गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करीत ठार केल्याची घटना घडली.वासुदेव वेटे असे बळी गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.जिल्हातील नागभीड तालुक्यात येणाऱ्या आकापूर येथील ते रहिवाशी होते.शुक्रवारला ते शेतात गेले मात्र परत आले नाही. शोधाशोध केले असतात आज त्यांचा मृतदेह सापडला.याच आठवड्यात गोंडपिपरी तालुक्यात वाघाने शेतकऱ्याचे तुकडे तुकडे केले होते.वाघाचे वाढलेल्या हल्ल्यामुळे शेतकरी संतापले आहेत.वन विभागाचा अधिकाऱ्यांजवळ शेतकऱ्यांनी आक्रोश केला.शेवटी वनविभागाने वाघाचा बंदोबस्त करण्याचे लेखी आश्वासन दिल्या नंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी नेण्यास नागरिकांनी परवानगी दिली.


0 टिप्पण्या