धाबा ग्रामपंचायतेच्या आर्थिक अपहाराचा चौकशीचे आदेश : दोन अधिकाऱ्यांकडे जवाबदारी, तर देऊळ बंद




पंधराव्या वित्त आयोगाचा निधीचा चुकीचा पद्धतीने वापर झाल्याचा आरोप आहे. जवळपास 80 लाखाचा अपहार झाल्याचे बोलले जात आहे. या आर्थिक अपहाराची चौकशी करण्यात यावी ही मागणी घेऊन सात मार्च पासून साखळी उपोषण केल्या जाणार आहे. दरम्यान सवर्ग विकास अधिकारी गोंडपिपरी यांनी गंभीरतेने दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.


संतनगरी अशी ओडख असलेल्या धाबा ग्रामपंचायतेत 80 लाखाचा कथित भ्रष्टाचाराची चर्चा रंगली आहे. 15 वित्त आयोगातील निधीचा नियमाना डावलून वापर केला गेला आहे. सन 2025 मध्ये लाखो रुपयाचा वस्तू घेतल्या गेल्यात.तसे देयक आहेत. प्रत्यक्षात या वस्तू सन 2026 ग्रामपंचायतेने लोकांपुढे ठेवल्या. वर्षभर या वस्तू कुठे होत्या? एक लाखात होणाऱ्या कामाचे देयक तीन लाखाचावर काढण्यात आले आहे. अनेक देयके संशयित आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी ही मागणी घेत सामाजिक कार्यकर्ते निलेश झाडे यांनी साखळी उपोषनाचा इशारा दिला. तसे निवेदन दिले. या निवेदनाची गंभीर दखल स्वर्ग विकास अधिकारी गोंडपिपरी यांनी घेतली आहे.चौकशिसाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांनी केली आहे. 


कार्यवाही निश्चित 


 या आर्थिक अपहारात समाविष्ट असलेल्या शासकीय कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यावर कारवाई होण्याचे संकेत आहेत. गावाचा विकास केला अशी ओरड करणाऱ्यांनी स्वतःच्या विकास केला अशी चर्चा आता गावात रंगली आहे.


 तर ' देऊळ बंद '


 ग्रामपंचायत येथील भ्रष्टाचाराची चर्चा होत असतानाच श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान संस्थानच्या आर्थिक कारभारावर गावकऱ्यांनी बोट उचललं आहे. महत्त्वाचे कागदपत्र गहाळ झाल्याची माहिती आहे. मागील सात वर्षाचे एडिट झालेलं नाही. संस्थांच्या विश्वस्तांमध्ये अंतर्गत कलह सुरू आहे. यामुळे संत नगरीची प्रतिमा मलिन झाली आहे. या सर्वांची चौकशी करण्यात यावी यासाठी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे निवेदन देण्यात येणार आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या