चंद्रपूर
देश्यात दिवाळी आनंदात साजरी झाली. मात्र चंद्रपुरात रक्त सांडलं. दिवाळीचा गिप्ट का दिला नाही हा लक्ष वाद शुल्कशा वाद हत्येवर येऊन पोहचला.सहा जणांनी मिळून एका तरुणाची हत्या केली. नितेश ठाकरे (२७) असे मृतक तरुणाचे नाव आहे. करण मेश्राम (२२), यश छोटेलाल राऊत (१९) अनिल रामेश्वर बोंडे (२२), प्रतीक माणिक मेश्राम (२२), तौसीफ शेख (२३), सुजित गणवीर (२५) या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्गापूर येथे सुजित गणवीर याचे पानटपरीचे दुकान आहे.त्याच्याकडे मृतक नितेश ठाकरे हा काही महिन्यांपासून काम करत होता.दिवाळी असल्याने नितेशने मालकाकडून नवीन कपडे किंवा गिफ्टची अपेक्षा केली होती. मात्र, सुजितने गिफ्ट दिले नाही.याचा राग धरून नितेश त्याला फोनवरून शिवीगाळ करीत होता. या प्रकाराला सुजित वैतागला.त्याने नको ते करायचे ठरविले. आपल्या मित्रांना सोबत घेत नितेशचा शहरातील लॉ कॉलेज परिसरात हत्या केली.
पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
केवळ हत्या करून तो थांबला नाही. घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचात्याने प्रयत्न केला.घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेच पथक घटनास्थळी पोहचले. तासाभरात त्यांनी आरोपीना अटक केली. अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक करीत आहे.
चित्रपट बघायला बोलाविले अन...
वाद टोकावर गेला होता. सुजितच्या मनात नितेशविरुद्ध कमालीचा राग होता. त्याने त्याची हत्या करण्याचे ठरविले.हत्येसाठी त्याने ऑनलाइन चाकू बोलाविला. नितेशला चित्रपट बघू असे सांगून त्याला बोलाविले.आपल्या मित्रांसह नितेशला बाहेर घेऊन गेला.शहरातील लॉ कॉलेजच्या मागील हुकूम परिसरात निर्जनस्थळी घेऊन आरोपींनी नितेशला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा जागीच मृत्यू झाला.


0 टिप्पण्या