गोंडपिपरी
मागील दोन वर्षांपासून गोंडपिपरी पोलिसांनी गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या विरोधात मोहीम उघडली आहे. मोठ्या कार्यवाही या दोन वर्षात झाल्यात. आज पाच पिक-अप वाहनाने 46 गोवंशीय गाय व बैलांची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.एकूण 50,20,000/- रु चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.गोंडपिपरी तालुक्याला तेलंगनाची सीमा लागून आहे. गडचिरोली येथुन तेलंगणा राज्यामध्ये पाच पिक अप वाहनांमधे गोवंशीय गाय व बैल या जनावरांची कत्तलीसाठी तस्करी होत असल्याची माहिती गोंडपिपरी पोलिसांना मिळाली.गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या वढोली येथे पोलिसांनी नाकाबंदी केली.या दरम्यान दरम्यान पाच वाहनात 46 जनावरे कोंबलेल्या स्तिथीत आढळून आले.मोहसीन आयुब खान ( वय 40 वर्ष ) रा. वाकडी, जि. असिफाबाद,
मोहम्मद मंजूर आली ( वय 42 वर्षे ) माजीदवाडा, ता. वाकडी, जि. आसिफाबाद ( तेलंगणा) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मुल सत्यजित आमले यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पोलीस हवालदार विलास कोवे, वंदिराम पाल, अनुप कवठेकर, पोलीस अंमलदार अतुल तोडासे, तिरुपती गोडसेलवार, प्रवीण कडूकर, प्रशांत नैताम, सुनील गव्हारे चालक पुनेश्वर कुळमेथे, मनिषा ठाकरे, सैनिक रियाज शेख, प्रशांत गुडपल्ले यांनी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


0 टिप्पण्या