तुम्ही सामाजिक क्षेत्रात असा, किवा राजकीय... तुम्हचा स्वभाव लवचिक असायला हवा.. परिस्थितीनुसार तुमचे डावपेच असावे. जर तुम्ही राजकीय क्षेत्रात कार्यरत असाल तर तुम्हची जवाबदारी अधिकच वाढते.जणसमुदायपुढे रडून तुम्ही त्यांना फार काळ मूर्ख बनवू शकत नाही. सत्ता काबीज करायची असेल तर साम, दाम, दंड, भेद याचा वापर करायलाच हवा. महत्वाचे म्हणजे हवेत उडू नका. पाय जमिनीवरच हवे. आता ज्यांना तुम्ही आपले, आपले म्हणता, केवळ त्यांच्यामुळे तुम्हाला सत्ता मिळाली काय? सर्वांचा यात सहभाग आहे. पण तुम्ही आकाशात उडू लागल्यात. स्वतःला मी म्हणजे सर्वकाही अशी धारणा केली. तुम्ही ज्यांना उभे केले, ते तोंडावर पडले. चंद्रपूर शहराची सत्ता तुम्हच्याकडे चालून आली. इथेही तुम्हचा इगो आला, सत्ता गेली. मी चुकलोच नाही, असा कांगावा सध्या सुरु आहे. तुम्हचा खरा चेहरा लोकांनी ओडखला आहे. आता मंचावर तुम्ही अश्रूचा पूर जरी आणला तरी त्यात कुणीही भिजणार नाही. कारण जनतेला कळलं आहे, तुम्ही सोंग घेता.सार्वजनिक जीवन जगताना केवळ सोंग घेऊन चालत नाही. तुम्हचे कार्य प्रभावशाली हवे आणि जनमानसात तुम्हची ' प्रतिभा ' स्वछ हवी.


0 टिप्पण्या