21 जानेवारीला अग्नीकुंड प्रभावळी, 22 ला गोपालकाल्याने समारोप
चंद्रपूर
आंध्रप्रदेश, तेलंगाना आणि विदर्भातील भाविकांचे आराध्य दैवत श्री संत परमहंस कोंडय्या महाराज यांच्या माघ शुद्ध तृतीया पर्वा वरील जन्म जयंती यात्रा महोत्सवाला 16 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे. सात दिवसांच्या यात्रा महोत्सवाचा 22 जानेवारीला समारोप होईल.
दिनांक 16 जानेवारी 2026 ला ग्रामसफाई आणि महाराजांच्या समाधीचे समाधी पूजन डॉ. ग गो गणवीर लिखित कों डया विजय ग्रंथाचे वाचन व महाराजांची सकाळची आरती होईल. संस्थांन चे माजी कोषाध्यक्ष अशोक भ स्की यांचे प्रवचन.त्यानंतर मंदिराच्या गर्भगृहातून महाराजांच्या पालखीला सुरुवात होईल. पालखीत 30 भजन मंडळ, लेझीम,ढोल -ताशा पथक यांचा समावेश राहील. संपूर्ण दिवसभर धा बा संत नगरीच्या मुख्य मार्गावरून पालखीचे मार्गक्रमण होईल. व सायंकाळी सहा वाजता समारोपा करता पालखी सभागृहात परत येईल. महाराजांचे आरती व स्त्रोत वाचन होईल. वढो ली येथील मंडळातर्फे हरिपाठ व भजनाचे सादरीकरण होईल.
17 जानेवारी 2026 ला राजुरा गोंडपिपरी विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगडे यांच्या हस्ते घटस्थापना होईल. याप्रसंगी संस्थांचे अध्यक्ष सुहास माडुरवार, माजी अध्यक्ष अमर बोड लावार , बाजार समिती सभापती इंद्रपाल धू डसे, उपसभापती स्वप्नील अनमु ल वार, सरपंच नंदा घोगरे, माजी सभापती अरुण कोडा पे व मान्यवरांची उपस्थिती राहील.
दिवसभरात डोंगरगाव आणि चंद्रपूर येथील भजन मंडळीच्या भजनाचा कार्यक्रम राहील व सायंकाळी निफांद्रा तालुका सावली येथील राजू ठाकूर व संचाचा अभंगवाणी कार्यक्रम होईल. त्यानंतर खंजिरी भजन स्पर्धेच्या उद्घाटनानंतर स्पर्धेला सुरुवात होईल.
दिनांक 18 जानेवारी 2026 ला समाधी पूजना करता एड.वामनराव चटप माजी आमदार राजुरा सपत्नीक हजेरी लावतील. याप्रसंगी एड.दीपक चटप, सेवानिवृत्त बि डिओ शालिक माऊली कर, माजी सचिव ऍड. सचिन फुल झेले, माजी अध्यक्ष बी.जी. पत्तीवार, माजी कोषाध्यक्ष अशोक भस्की, मनोज कोप्पावार, प्रफुल अस्वले यांची प्रमुख उपस्थिती राहील.
सकाळी 11 पासून मंडळ संपेपर्यंत खंजिरी भजन स्पर्धा चालू राहील.
दिनांक 19 जानेवारी 2026 ला समाधी पूजन करता भारत सरकार केंद्रीय मागास आयोग अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांचे हस्ते होईल.
याप्रसंगी गजानन माध्यस्वार, राजू चिलमंतवार, बबनराव निकोडे,किशोर अगस्ती यांची उपस्थिती राहील. दुपारी गजानन क्षीरसागर भद्रावती संतवाणी कार्यक्रम सादर करतील. साथ संगत वासुदेव चटारे गुरुजी आणि संच करतील, त्यानंतर रामपूरच्या भजन मंडळाचा कार्यक्रम सादर होईल. सायंकाळी 7 ते 9 शाहू महाराज भजन मंडळ दहेली यांचे सादरीकरण होईल. त्यानंतर कीर्तनकार जयश्रीताई गावतुरे यांचे प्रबोधनात्मक कीर्तन होईल.
दिनांक 20 जानेवारी 2026 ला माजी मंत्री तथा आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार, तेलंगाना राज्याचे शिरपूर- कागज नगरचे आमदार डॉ.हरीश बाबू पालवई
यांच्या हस्ते संयुक्त पद्धतीने समाधी पूजन होईल. याप्रसंगी मध्यवर्ती बँक संचालक सुदर्शन निमकर, संचालक उल्हास जी करपे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे व माजी आमदार संजय धोटे, हरीशजी शर्मा बल्लारपूर उपस्थित राहतील.
अकरा वाजता कीर्तनकार सांगळे महाराज यांचे कीर्तन होईल तर 1वाजता कीर्तनकार आकाश तावी डे आणि संचा चे किर्तन होईल.
दुपारी दोन वाजता गणेश राऊत व संच यवतमाळ यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम होईल व त्यानंतर लगेच पूर्णा जी खानो दे आणि संच यवतमाळ संतवाणीचे सादरीकरण करतील. सायंकाळी सात ते नऊ वासुदेव चटारे गुरुजी, शालिनी रामकृष्ण सांगळे वसंचं भजन सादरीकरण करतील. तर 9 ते 11 कीर्तनकार कुरुमकर महाराज अकोला यांचे समाज प्रबोधन कीर्तन होईल.
21 जानेवारी 2026 ला महाराजांचे समाधीपूजन राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते तथा गटनेते माजी मंत्री विजयराव वडेट्टीवार, चंद्रपूर वनीआर्णी च्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, माजी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार शिरपूर -कागज नगर (तेलंगाना) को णेरी कोनप्पा
यांचे हस्ते होईल. प्रमुख उपस्थिती संस्थांचे विश्वस्त अशोक रेचन कर,देविदास सातपुते, महेश सोना कुलवार नरसिमल चे पुरवार, नामदेव सांगळे, संस्थांन चे माजी सचिव सचिन फुलझले, बाजार समिती संचालक संतोष बंडावार, देवेंद्र बट्टे, मनोज नागापुरे बालाजी चणकापुरे, तुकाराम जी झाडे यांची राहील. 11:00 वाजता गजानन महाराज भजन मंडळ चंद्रपूरच्या महिलांचे सादरीकरण होईल. त्यानंतर झी टॉकीज फेम डॉ. प्रशांत ठाकरे महाराज अकोला यांचे समाज प्रबोधन पर किर्तन होईल. सायंकाळी सात ते नऊ तेलंगाना रुद्रापूर येथील संगीता वअंज या दुर्गे तेलगू हिंदी मराठी भक्ती गीत गीतांचे सादरीकरण करतील. 11 नंतर तुलसी रामेश्वर सेगमवार महाराज, बाबुराव महाराज पंचाक्षरी, स्वामी मोलमठम, ओम साई नंदी कोंडावार व पुजारी अग्नि कुंड प्रभावडीच्या विधीला सुरुवात करतील. हा विधि पहाटे तीन पर्यंत चालेल.
दिनांक 22 जानेवारी 2026 ला शेवटच्या दिवशी चे समाधीपूजन राजूराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, तेलंगणाचे विधान परिषद माजी आमदार विठ्ठल दंडे, चां दा शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोक जीव तोडे, सुहास जी माडुरवार, बबनराव पत्तीवार,नंदकिशोर तंडूरवार यांचे हस्ते होईल.
त्यानंतर ह भ प लक्ष्मण दास जी काळे महाराज अमरावती यांचे यांचे प्रबोधनात्मक गोपालकाल्याचे किर्तन होईल.
उपस्थित भाविकांना काला व महाप्रसादाचे वितरण होऊन यात्रेचा समारोप होईल.
यात्रेच्या कामकाजाकरता विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून कागज नगर, शिरपूर येथून जादा बसेसची सोय आहे. राजुरा अहेरी चंद्रपूर डेपोमार्फत जादा बसेसची सोय करण्यात आलेली आहे. तरी भाविकांनी हजारोंच्या संख्येत धाबा संत नगरीत उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थांचे अध्यक्ष सुहास माडुरवार, सचिव राजू चिलमंतवार, कोषाध्यक्ष रामकृष्ण सांगळे व विश्वस्त मंडळाने केले आहे.


0 टिप्पण्या