आमदार जोरगेवारांचे काय चुकलं?




( निलेश झाडे )


खरंतर आता यावर चर्चा करण्याचे काही एक कारण नाही. वेळ निघून गेली आहे. वरवर दुभंगलेली मने जुळली, असं चित्र आहे. हे ही खरे, वरवर राख दिसत असली तरी आतून निखारे तेवत आहेत. एवढ्यासाठीच हा प्रपंच...


चंद्रपुरात माजी मंत्री हंसराज अहिर, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे चेहरे होते.अहिर यांच्या चेहरा सर्वसामान्य माणसांना जुळवून घेणारा होता. राजकारणात असून राजकारणा पलीकडे जगणारा या माणसाचे कुणी शत्रू असू शकतील, असं कुणालाही वाटलं नव्हतं. अहिर यांच्या निवडणुकीत पराभव झाला. परवाभवाची त्यांनी समीक्षा केली असेलच, यातून जे पुढे आले, ते राजकारण सक्रिय असलेल्यानी ओळखलं. अनेकदा मनातील खदखद अहिर यांनी बोलून दाखविली.हा झाला इतिहास. आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजप प्रवेश निश्चित केला होता. त्यांचा या प्रवेशाला टोकाचा विरोध झाला. ज्यांनी विरोध केला त्यांचा डोक्यावर पाय ठेवून जोरगेवार भाजपात गेले. विरोध इथेच संपला नाही. बंडखोर पुढे आला. शेवटी जनता जोरगेवार यांच्या पाठीशी उभी झाली. ते आमदार झालेत. खोके, बाहेरचे अशी टीका झाली.


खरा प्रश्न असा, राजकारणात कुणी, कुणाचं नसतं.हे त्रिवार सत्य आहे. जोरगेवार यांनी आपल्या कौशल्याने एक पाऊल पुढे टाकीत गेले. इथे त्यांचं काय चुकलं? मोठेपणा कुणाला नको ? जोरगेवार यांनी तशी अपेक्षा केली तर चुकलं कुठं ? जोरगेवार कसे मोठे आहेत, यासाठी हा शब्द प्रपंच नाही.एखादा व्यक्ती पुढे येत आहे, तर अडवायचं कश्याला? फुलं उधळता येत नसली तर किमान हातात गोटे नसावे.आपलं अध्यात्म म्हणत, जैसे करेगा, वैसे भरेगा. हे राजकारणाला लागू होतं असं मुळीचं नाही.


मनपा निवडणुकीचा तोंडावर भाजप नेत्यात मोठेपणाला घेऊन जे काही घडलं ते चुकीचं होतं.थेट नागपूर, मुंबईला चंद्रपूरचा कलगीतुरा पोहचला. आता '  हम साथ साथ है ' असं वरवर दिसत असलं तरी अजूनही हातात हात नाही. चंद्रपूर मनपाचा निकाल बरंच काही सांगून जाणार आहे..भाजप हरला तरी जिंकला तरी...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या