निलेश झाडे
सध्या काँग्रेस नेते वडेट्टीवार-आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यातील शाब्दिक वाद समाज माध्यमात वायरलं झाला आहे. हे दोन्ही नेते केवळ चंद्रपूर नव्हे तर राज्यातील राजकारणाचे महत्वाचे आणि तेवढेच प्रतिष्ठित चेहरे आहेत. वादाचे कारण काय? गौतमी पाटील.काँग्रेसने गौतमी पाटील हिचा रोड शोचे आयोजन केले.प्रचारासाठी प्रसिद्ध कलाकारांना बोलाविने यात काही नवल नाही. पण
आमदार सुधीर मुनगंटीवार यांना ते रुचलं नाही. विरोध करायचा तर टोकाचा. मुनगंटीवार यांनी काँग्रेसवर बोचरी टीका केली.मुनगंटीवार यांनी कलाकाराला घेऊन अशी टीका करायला नको होतं.मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी कलाकार आलेच होते की ? ही टीका करून मुनगंटीवार फसलेत. काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी पलटवार केला.वडेट्टीवार यांनी मुनगंटीवार यांना आरसा दाखविला.खरंतर प्रचारात विकासाचे मुद्दे असायला हवेत. शोकांतिका अशी की तेच प्रचारात दिसत नाही.


0 टिप्पण्या