माझ्या गावात संत परमहंस कोंडय्या महाराज यांचे देवस्थान आहे.संत परमहंस कोंडय्या महाराज यांचे देवस्थान संस्थान यासाठी कार्य करीत असते. ही संस्थान सध्या फारच चर्चेत आहे. मागील सात वर्षाचा हिशोब दिला गेला नाही. महत्वाचे कागदपत्र गहाड झाले, अशी माहिती मिळाली. हे कागदपत्र फारच महत्वाचे होते. आता काही आरोप करीत सुटले आहेत, यात फार मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. हा खरंतर चौकशीचा विषय. त्यावर मी बोलणार नाही. ज्या चर्चा सुरु आहे, त्यामुळे केवळ मंदिर नाहीतर गावाची गावाची नाहक बदनामी होत आहे.कागदपत्र गहाड का होतात, हा शोधाचा विषय. एवढं खरं यांच्या माकडचाळ्यामुळे गावाची अब्रू वेशिवर टांगल्या गेली आहे. आपलं पोट मारून भाविक दान करतात. त्याच्यावर कुनू डल्ला मारला असेल तर ते नंबरी पापी. यांच्या सावली पासून सुद्धा दूर असावे ज्यांनी देवाला सोडलं नाही, ते माणसांना काय सोडतील. तुम्हच्या शरीराचे लचके तोडून तोडून खातील. हे केवळ नावाचे मोठे आहेत, असं म्हणावे लागेल.
मंदिरात राजकारण सुरु झालं आहे. भक्त असं म्हणतात कोंडय्या महाराज जागृत आहेत. यांचं राजकारण बघून महाराजांनी केव्हाचेच मंदिर सोडलं असेल. ज्याने आपलं अख्य आयुष्य माणसांना जागृत करण्यासाठी खर्च केले, त्याचाच गाभाऱ्यात राजकारणाचा घाणेरडा खेळ सुरु आहे.
ही देवाला न घाबरणारी माणसे. तुम्हाला काय घाबरतील? कोंडय्या तुम्हचा आम्हचा आहे. त्याचा दरबारात जाण्यासाठी कुणाची परवानगी कश्याला हवी? आता तो नाहीच तिथे, कश्याला जायचं मग? त्यांना राजकारण करू दय्या.आपण घरा घरात स्वामीला बसवू.
निलेश झाडे


0 टिप्पण्या