तेलंगनाची पुन्हा मुजोरी, देविदास सातपुते प्रशासनाशी भिडले

 


महाराष्ट्र व तेलंगणा राज्यांना जोडणारा वर्धा नदीवरील महत्त्वाचा पूल आणि राज्य महामार्ग क्रमांक 369 (SH-369) रस्ता खराब होत असल्याने अचानक बंद करण्यात आला होता. यामुळे सीमावर्ती भागातील हजारो नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. हा महत्वाचा विषय लोकनेते देविदास सातपुते यांनी उचलून धरला. तेलंगणा प्रशासनाला मार्ग खुला करण्यास भाग पाडले होते. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा तेलंगणा प्रशासन, सिरपूर ग्रामपंचायतेचे पदाधिकारी मार्ग बंद करण्यासाठी jcb ने मार्ग खोदू लागले होते. याची माहिती मिळताच सातपुते यांनी घटनास्थळी धावून जाऊन तेलंगणा प्रशासनाला धारेवर धरले. मार्ग बंद करण्याचा हालचालीला तीव्र विरोध केला. शेवटी प्रशासन नमले. देविदास सातपुते यांना मार्ग खुला ठेवण्यात पुन्हा यश आले. मात्र वारंवार तेलंगणाची या मुजोरीमुळे सीमावर्तीत भागात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या