हिवरा गावाचा सरपंच होण्यासाठी उतावीळ झालेल्या एका स्वयंभू नेत्याचे कारनामे आता पुढे येऊ लागले आहेत. या नेत्याकडे एक ट्रॅक्टर चोरीची, दुसरी ट्रॅक्टर बचत गटाचा नावावर उचल केल्याची माहिती आहे. या दोन्ही ट्रॅक्टरचा वापर रेती चोरीसाठी हा नेता करीत आहे. हिवरा घाटातील सर्वाधिक रेती चोरी करणाऱ्यात या नेत्याचा समावेश आहे. विशेष म्हणजे गरिबांना मिळणाऱ्या अनेक योजना याने आपल्या खिश्यात घातल्या आहेत.' येथे पाहिजे जातीचे ' ( जातीचे म्हणजे माणसाला चिकटलेली जात नाही, तर बस म्हटलं तर बसणारा, उठ म्हटलं उठणारा असा त्याचा अर्थ घ्यावा. )असा आग्रह धरणाऱ्या राजूर्यातील नेता सत्तेत असताना याने हा कारनामा केलेला आहे.प्रशासन आणि शासनाला लुटणारा हा व्यक्ती हिवरा गावाचा सरपंच होण्याचे स्वप्न बघत आहे.आधीच लकवा मारलेल्या ' हाता ' ला असे नेते अधिक शक्तिहीन करीत आहेत.
घरकुल बांधकामासाठी शासनाने काही रेती घाट राखीव ठेवले आहेत. अश्या घाटातून घरकुल लाभार्थ्याला 5 ब्रास रेती दिल्या जाते. यासाठी केवळ रेती वाहतूकसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाचा तेवढा खर्च घरकुल लाभार्थ्याला द्यावा लागतो, तसा नियम आहे. घडत मात्र वेगळेचं आहे.घरकुल बांधकामासाठी शासनाने राखीव ठेवलेल्या रेती घाटातुन मोठ्या प्रमाणात रेतीचा उपासा सुरु असल्याची चर्चा आहे. हा घाट हिवरा घाट या नावाने ओडखला जातो. ही एक प्रकारची तस्करी झाली. यात केवळ राजकीय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते गुंतले आहेत, असे बोलले जाते.खरंतर या घाटातील रेती घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य दिली जाते, केवळ वाहतूकीचा खर्च लागतो. मात्र घरकुल लाभार्थ्यांकडून एका ट्रॅक्टर ट्रिपचे 2000 ते 3000 घेतल्या जात असल्याची माहिती आहे. घरकुल वगळता इत्तर कामासाठी या घाटातील रेतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.शासनाचाच महसुलावर डल्ला मारणारे हे नेते खुर्चीवर बसण्याचे स्वप्न रंगवीत आहेत. अश्या तस्करावर कुठलीच कार्यवाही होत नाही, ही मोठी शोकांतिका

0 टिप्पण्या