हिवरा रेती घाटातून रेती तस्करी करून तीच रेती घरकुल लाभार्थ्यांकडून मोठी रक्कम घेऊन विकणारे काही गावनेते गावाची धुरा खांद्यावर घेण्याची तयारी सुरु केलेली आहे. शासनाचा लाखो, करोडो रुपयावर डल्ला टाकणारे हे चोर, आम्हीच तुम्हचे भाग्यविधाते आहोत अशी बतावनी करून निर्लज्जपणे ' हात ' पुढे करीत आहेत.
घरकुल बांधकामासाठी शासनाने काही रेती घाट राखीव ठेवले आहेत. अश्या घाटातून घरकुल लाभार्थ्याला 5 ब्रास रेती दिल्या जाते. यासाठी केवळ रेती वाहतूकसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनाचा तेवढा खर्च घरकुल लाभार्थ्याला द्यावा लागतो, तसा नियम आहे. घडत मात्र वेगळेचं आहे.घरकुल बांधकामासाठी शासनाने राखीव ठेवलेल्या रेती घाटातुन मोठ्या प्रमाणात रेतीचा उपासा सुरु असल्याची चर्चा आहे. हा घाट हिवरा घाट या नावाने ओडखला जातो. ही एक प्रकारची तस्करी झाली. यात केवळ राजकीय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते गुंतले आहेत, असे बोलले जाते.खरंतर या घाटातील रेती घरकुल लाभार्थ्यांना विनामूल्य दिली जाते, केवळ वाहतूकीचा खर्च लागतो. मात्र घरकुल लाभार्थ्यांकडून एका ट्रॅक्टर ट्रिपचे 2000 ते 3000 घेतल्या जात असल्याची माहिती आहे. घरकुल वगळता इत्तर कामासाठी या घाटातील रेतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.शासनाचाच महसुलावर डल्ला मारणारे हे नेते खुर्चीवर बसण्याचे स्वप्न रंगवीत आहेत. अश्या तस्करावर कुठलीच कार्यवाही होत नाही, ही मोठी शोकांतिका आहे.

0 टिप्पण्या