पोडसा ते गोजोली मार्गांवर काही माणसे उभे असलेली तुम्हाला दिसतील. यांना ' गावठी वाहतूक शिपाई ' अशी उपाधी जनतेनी बहाल केली आहे. आता हे तुम्हाला कधी दिसतील? तर अगदी पहाटे किवा रात्रीचा अंधारात. यांचं काम अंधारातच चालतेय, तशी चर्चा आहे. हे अंधारात कुठलं काम करीत असतील ? यांचे चेहरे बघितल्यावर लक्षात येईल, अरे च्या हे तर नेते. हे नेते असले तरी गावाचा सुरक्षेसाठी यांचं जागरण नाही, हे भलत्याच कामासाठी जागतात. यांच्या एक फायदा गावाला होत आहे, ते म्हणजे गावात चोर येण्यास घाबरत आहेत. पण अशी ही चर्चा आहे की, खरे चोर हेच.
पण शेवटी नेते आहेत. त्यांना चोर म्हणणे म्हणजे महापाप. कोण पापी होणार. यांच्याकडे बघून काही सरकारी विभागाचे कर्मचारी ही हात जोडतात. का? तर धन्य तुम्ही जीवाची पर्वा न करता जागत आहात. मी असे ऐकले आहे की यांचे पुतळे सुद्धा आता उभे होणार आहे. यांच्या पुतळ्यांना चरणस्पर्श करताना गोंडपिपरी तालुक्यातील एक मोठा अधिकारी सुद्धा दिसणारा आहे.कारण काय तर या गावठी शिपायांनी ' वाळू ' तुन तेल काढण्याचे कौशल्य त्यांना शिकवलं आहे. धन्य ते गावठी वाहतूक शिपाई, धन्य ते अधिकारी. सर्वांनी डोळे बंद करा आणि या महान व्यक्तींना प्रणाम करा.
निलेश झाडे


0 टिप्पण्या