मूर्खांच्या बाजार! कोंडय्या महाराज देवस्थान संस्थेच्या कारभार

 





दोन राज्यातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान संस्थेचा कारभार म्हणजे मुर्खाचा बाजार ठरला आहे. 13 जून 2026 ला झालेल्या विशेष सभेत संस्थांचे कोषाध्यक्ष रामकृष्ण सांगडे यांना पदावरून आणि विश्वस्त पदावरून काढण्यात आले होते. विश्वस्तांचे नाव असलेल्या कार्यालयातील बॅनरवर सांगडे यांच्या नावावर पांढरा कागद चिपकवीला गेला. मात्र आता दस्तावेज आणि आलमारीचा चावीसाठी पाठविलेल्या पत्रात सांगडे कोषाध्यक्ष असं लिहिलेले आहे. पत्र 20 जूनला मिळाले तर पदावरून 13 जूनला काढण्यात आले, असे असताना पदाचा उल्लेख संस्थेने केला आहे.


श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान संस्थांन धार्मिक संस्थान आहे काय? असा प्रश्न निर्माण व्हावा इतके वाद या संस्थेतून पुढे आलेत . कधी नव्हे ते सभागृह आणि मंदिर परिसरात  मारहाण झाली होती. येथील पदाधिकारी आणि विश्वस्तांचा वादाची चर्चा दाहिदिशा व्यापून टाकली होती. येथे झालेला कथित अपहार थेट धर्मदाय आयुक्त कार्यालयात पोहचला आहे. ही संस्था वादाचा आखाडा बनली आहे.हे कुणामुळे आणि का घडले, याची चर्चा सुरु आहे.


अश्यात संस्थेने कोषाध्यक्ष असलेल्या सांगडे यांना पदावरून काढले. ही सभा तेरा जूनला झाली. सात दिवसानंतर सांगडे यांना संस्थेने पत्र पाठवलं. या पत्रात सांगडे यांच्या नावापुढे कोषाध्यक्ष पदाचा उल्लेख केलेला आहे.मागील वर्षभरापासून एक ना धड भाराभर चिंध्या असं संस्थेचे सुरू आहे.ज्याला पदावरून काढलं त्याचा नावापुढे ' माजी ' हा शब्द लावायला हवा होता. हे पत्र सद्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या