ग्रामसेवा समितीची समाजसेवा चर्चेत : काय केलं त्यांनी ?





खरंतर गावाची सेवा आणि समाजसेवा या सारखे दुसरे पुण्य नाही, असं संतांनी सांगितलं आहे. दुदैव असे की सण, वार बघून काही सेवा करायला पुढे येतात. मात्र संत परमहंस कोंडय्या महाराज ग्रामसेवा समिती याला अपवाद ठरली आहे. धाबा गावातील सार्वजनिक प्रश्न सोडविण्यासाठी समिती प्रभावी कार्य करीत आहे.


काय केलं ? 


वार्ड क्रमांक दोन मधील तलाठी कार्यालयाचा मागील बाजूचा मार्गांवर पाईपलाईनचे खोदकाम करण्यात आले होते.त्यामुळे मार्गांवर चिखल झाले.या मार्गांवरून ये जा करताना मोठी कसरत नागरिकांना करावी लागत होती. ही समस्या सोडविण्यासाठी संत परमहंस कोंडय्या महाराज ग्रामसेवा समिती धावून आली. समितीने  विटाचे तुकडे टाकून मार्ग दुरस्त केला.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या मार्गातील लोखंडी सलाखी बाहेर आल्या होत्या. यामुळे नागरिकांना दुखापत होण्याची शक्यता वाढली होती. या मार्गाचे काम सुद्धा समितीने केले.


यांचा होता सहभाग 



सामाजिक कार्यकर्ते रामकृष्ण सांगडे आणि मनोज कोप्पावार यांच्या पुढाकारातून ही समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती गठीत होण्याचा पूर्वी सांगडे आणि कोप्पावार यांनी विध्यार्थासाठी अनेक उपक्रम राबविले होते. आता गावात समितीचा माध्यमातून समस्या सोडविल्या जात आहेत. रवी मावलीकर,आदर्श वनकर, मोशिम शेख, राकेश पोहणे, जानकीराम तुंबडे,सुमित चटारे,प्रणय मडावी,राहुल खारकर, विक्की भगत,अनिल डोंगरे, रोशन चनेकार, गोवर्धन येलमुले, कांशीराम अवथरे,सुरज भस्की यांची उपस्थिती होती.



Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या