शेतकऱ्यांचा नावावर ट्रॅक्टर मालकांची बल्ले बल्ले! हजारो लिटर डिझेल कॅनमधून जातेच कसे ?

 


इमेज ai 

 शेती हंगाम ट्रॅक्टरनेच केला जात असल्याने, सद्या ट्रॅक्टरची फारच गरज शेतकऱ्यांना आहे.कॅनमधून रोज हजारो लिटर डिझेल पेट्रोल पंपातून नेल्या जाते. यातील किती ट्रॅक्टर मालक शेतकऱ्यांना उपलब्ध होतात हे तपासणे ही आता गरजेचे झाले आहे. प्रत्येक पेट्रोलपंपात cctv असतात.cctv फुटेजची तपासणी करून कॅनमधून डिझेल नेणाऱ्यावर कठोर कार्यवाही करावी.


देश्यात सध्या इंधणाचा मोठा तुटवडा आहे. इधन जपून वापरण्याचे आव्हान दिल्लीतुन केल्या गेले. जागरूक नागरिकांनी इंधन बचतीसाठी प्रभावी पाऊल सुद्धा उचलेले आहेत. मात्र गोंडपिपरीत फारच वेगळे चित्र आहे. शेती हंगामाचा फायदा घेत 50 ते 60 लिटर डिझेलच्या कॅना भरून दररोज हजारो लिटर डिझेल नेल्या जात आहे. जेव्हा की हा प्रकार नियमबाह् आहे. तालुक्यात शेतीसाठी असे सांगून शेकडो ट्रॅक्टरची उचल करण्यात आलेली आहे. यातील अनेक ट्रॅक्टर खनिज चोरीत सापडलेल्या आहेत. जेव्हा की त्यांना शेतीची कामे वगळता इत्तर कामासाठी ट्रॅक्टर वापर करता येत नाही.सध्या तालुक्यात खनिज चोरीचे प्रकार वाढले आहेत. अश्या या  ट्रॅक्टर मालकांना शेकडो लिटर डिझेल मिळत असल्याने खनिज चोरीत वाढ झाली आहे. नियमात बसत नसताना सुद्धा पेट्रोल पंपधारक यांना डिझेलचा पुरवठा करीत असल्याने महसूल विभागाचे मोठे नुकसान होत आहे.

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या