मार्च 2025 ला आठ लाख 60 हजाराचे सोलर वाटर टॅंक घेण्यात आले.चार लाख 32 हजार 79 रुपयाचे दोन देयक दिनांक 28/03/2025 चे आहेत. वर्षभर सोलर वाटर टॅंक लावण्यात आले नव्हते. कथित आर्थिक अपहारची चर्चा सुरु झाली आणि सन 2026 जानेवारीला अंगावाडीत सोलर लावण्यात आले.वर्षभर सोलर कुठे होते? सोलर खरेदी करण्यात आले नव्हते. वर्षभर आठ लाख रुपये कुणी वापरले, हा खरा प्रश्न आहे.
संतनगरी अशी ओडख असलेल्या धाबा ग्रामपंचायतेत 80 लाखाचा कथित भ्रष्टाचाराची चर्चा रंगली आहे. 15 वित्त आयोगातील निधीचा नियमाना डावलून वापर केला गेला आहे. सन 2025 मध्ये लाखो रुपयाचा वस्तू घेतल्या गेल्यात.तसे देयक आहेत. प्रत्यक्षात या वस्तू सन 2026 ग्रामपंचायतेने लोकांपुढे ठेवल्या. वर्षभर या वस्तू कुठे होत्या? एक लाखात होणाऱ्या कामाचे देयक तीन लाखाचावर काढण्यात आले आहे. अनेक देयके संशयित आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी ही मागणी घेत सामाजिक कार्यकर्ते निलेश झाडे यांनी साखळी उपोषनाचा इशारा दिला. तसे निवेदन दिले. या निवेदनाची गंभीर दखल स्वर्ग विकास अधिकारी गोंडपिपरी यांनी घेतली आहे.चौकशिसाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती त्यांनी केली आहे.


0 टिप्पण्या