अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी उद्धव नारनवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती केंद्रीय उपाध्यक्ष रोहीदास राऊत यांनी पक्षाच्या जिल्हा कार्यकर्ता बैठकीत केली. यामध्ये त्यांनानि युक्तिपत्र देण्यात आले. उद्धव नारनवरे आपल्या क्षेत्रातील गोरगरीब, दिनदुबळे, शेतमजूर, शेतकऱ्यांकरिता अहोरात्र वेळ देऊन त्यांच्यासाठी झटणारे व्यक्तिमत्व आहे.ते सामाजिक व राजकीय घडामोडीत त्यांचा नेहमी सहभाग असतो.जिथे उजेड नाही तिथे दिवा घेऊन जाण्याचे कार्य सुरु राहिल, अशी ग्वाही त्यांनी दिली.रिपब्लिकन उद्धव नारनवरे यांची गडचिरोली जिल्हा अखिल भारतीय पक्षात उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कामसेन वनकर, डॉ. गलबले, सावन नारनवरे, दिलीप डोर्लीकर, कालीदास दुर्गे, शैलेश वनकर, अशोक खंडारे आदींनी अभिनंदन केले आहे.


0 टिप्पण्या