इको-प्रो संस्थेचे 'अन्नत्याग सत्याग्रह' आठव्या दिवशी; भजन सत्याग्रहातून सरकारला वन्यजीव रक्षणाचे साकडे
चंद्रपूर
वाढता मानव-वन्यजीव संघर्ष, वाघांच्या हल्ल्यात जाणारे निष्पाप बळी आणि ताडोबाच्या अत्यंत महत्त्वाच्या 'लोहारडोंगरी' वन्यजीव कॉरिडॉरला सुरुंग लावणाऱ्या प्रस्तावित खाण प्रकल्पाविरोधात इको-प्रो संस्थेचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या अन्नत्याग सत्याग्रहाने आज आठव्या दिवशी प्रवेश केला. आठ दिवस उलटूनही प्रशासकीय पातळीवर ठोस हालचाली होत नसल्याने, आज उपोषणमंडपात समाजकार्य चे विद्यार्थी आणि विविध संस्थेची पदाधिकारी यांनी "भजन सत्याग्रह" करून सरकारला कडे साकडे घातले.
यावेळी उपस्थित विद्यार्थीनी ‘वैष्णव जन ते न कहिये, खरा तो एकची धर्म, हीच आमची प्रार्थना, हम होगे कामयाब, तन मन धन से सदा सुखी हो’ आदि भजन आणि प्रार्थना विद्यार्थानी गायले.
आज उपोषणाला समर्थन देणारे संस्था संघटन मधे छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था, मराठा सेवा संघ, बहुजन हितकरिणी सभा, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, भारतीय जीवन बीमा संघटन, रिपाई आठवले गट, महात्मा जोतिबा फुले तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर विचार संवर्धन समिती, चंद्रपूर, पर्यावरण संवर्धन समिती, चंद्रपूर, पर्यावरण वाहिनी, बल्लारपूर, चंद्रपूर बचाव संघर्ष समिती
बंडू नगराळे, adv तबस्सुम शेख, नागपूर वरून स्वानंद सोनी, उदयन पाटील, श्रीकांत देशपांडे, शाम पांढरीपांडे, अनुसया साबरानी, adv नीरज खांदेवाले, डॉ सुशील मुंदडा, प्रा देवेंद्र बोरकुटे, प्रा संतोष आडे, प्रा जयश्री कापसे, प्रा प्रगती नरखेडकर, बेबीताई उईके, गोलू बाराहाथे यांनी भेटी दिल्या.


0 टिप्पण्या