माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीने धाबा ग्रामपंचायतेचे विविध कारनामे पुढे येत आहेत. अश्याच एका कारणाम्यामुळे गावकऱ्यांचे डोकं चक्राविले आहे. धाबा ग्रामपंचायतेने ज्या दुकानाचा नावावर लाखो रुपयाचे बिल काढले, ते दुकान अदृश्य झाले आहे.विशेष म्हणजे या दुकानाचा संपर्क क्रमांक 11 आकडी आहे.गजानन मटेरियल सप्लायर्स असे या दुकानाचे नाव आहे.या दुकानात विटा, सिमेंट, गिट्टी आणि मटेरियल मिळतात असे, बिलावर लिहिले आहे. याचं दुकानाचा नावावर नालीतील मलमा उचलण्याचे लाखोचे बिल काढल्या गेले, तशी माहिती माहितीचा अधिकारातुन पुढे आली आहे. या दुकानाचा शोध सुरु असताना प्रकाश नावाचे इलेक्ट्रिक दुकान सुद्धा अदृश्य झाले आहे. येथून सुद्धा लाखो रुपयाचे सामान धाबा ग्रामपंचायतेने खरेदी केल्या गेले आहे.


0 टिप्पण्या