अदृश्य दुकानाची शोध मोहीम सुरु असताना धाबा ग्रामपंचायतेच्या ' दिव्यशक्तीचा ' प्रत्यय आला आहे. ग्रामपंचायतेने तेरा वर्षांपूर्वी मृत पावलेल्या व्यक्ती 2024 मध्ये पृथ्वीवर बोलाविले. त्याच्या हातून कोंडवाड्यातील जनावरांना पाणी, चारा खायला लावला. या कामाची ग्रामपंचायतेने मजुरी दिली आणि त्यांना परत स्वर्गात पाठविले.
धाबा येथील रहिवाशी विलास चनेकार यांचे निधन सण 2012 मध्ये झाले होते.असे असताना त्यांचा नावाने ग्रामपंचायतेने 7200 रुपयाचे देयक काढले आहे.हे देयक सण 2024 चे आहे.खर्चाच्या पावतीवर वाउचर क्रमांक नाही.स्वाक्षरीचा नावाने केवळ विलास असं लिहिलं आहे. त्यावर निशाणी अंगठा नाही.ही माहिती स्वतः ग्रामपंचायतेने माहितीच्या अधिकाराखाली मागविलेल्या माहितीत दिली आहे. दरम्यान,चनेकार यांच्या मुलाशी संपर्क साधला असता 7200 रुपये मिळाले नसल्याचे सांगितले.


0 टिप्पण्या