महाराष्ट्र संतांची आणि महापुरुषांची नगरी आहे. अनेक संत इथे झालेत. त्यांचा विचाराचा मार्गांवर महाराष्ट्र चालतोय. जातीभेद, धर्मभेद याचा समाचार घेत असतानाच अंधश्रद्धेवर त्यांनी मोठा प्रहार केला. या संतांचे फोटो घराघरात असले तरी त्यांचे विचार आपल्या डोक्यात अद्याप भिनले नसल्याचा प्रत्यय महाराष्ट्राला आला आहे. खरात नावाचा कुणीतरी भोंदू नको ते सांगून शारीरिक शोषण करतोय. याचं भोंदू बाबाचे राज्यातील मोठमोठे नेते पाया पडतात, कुणी छत्री घेऊन उभे असतात. त्याचे कारनामे पुढे येत आहेत. मला कळतं नाही की असे बाबा मोठे कसे होतात ? याला कोण जवाबदार ? तो सांगतो बोट कापा, कापून टाकतात.. तो म्हणतो... पूजा करायची आहे, कपडे उतरवितात.. कोण तर स्वतःला सुशिक्षित म्हणवीणारे. तुमच्यापेक्षा आमच्या ग्रामीण भागातील अडाणी बरे. आमच्या ग्रामीण भागातील आया-बहिणींना कुणी असं करायला सांगितलं तर पायातील चपलेने चोपून काढतील. तुमच्या सुशिक्षितपणा तुम्हालाच बरं, आम्ही अडाणीच बरे बाबा.
या जगात कुणाकडेच दैवीशक्ती नाही. केवळ हे दैवीशक्ती असल्याचे सोंग करतात. इतरांचे भविष्य सांगणारा खरात स्वतःचे भविष्य ओळखु शकला नाही.
संतांनी म्हटले, तो तुझ्या हृदयात आहे. कोण तर ज्याला कुणी देव, कुणी ईश्वर, कुणी परमात्मा म्हणतात तो. बाहेर कितीही शोधा तो सापडणार नाही. राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वतःच्या कर्तुत्वाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. बुद्धिमत्ता, हुशारी, योग्य नियोजन, संघटन शक्ती यासोबतच जण सामान्यांची मोठी ताकद हे राजे यांचे खरे बळ होते.त्यांच्याकडे दैवीशक्ती नव्हतीच. मग या टुकार लोकांकडे दैवी शक्ती कशी असेल ? इत्तरांचा आईला आईचा दर्जा राजे यांनी दिला. शत्रूचा पत्नीला त्यांनी आई मानले. महिलाना शिक्षित करण्यासाठी आई सावित्रीबाई फुले यांनी किती यातना सहन केल्या. आई रमाईने कुणासाठी दुःख उपसलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांना अधिकार मिळवून दिले.तुम्हाला अधिकार मिळवून देण्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचले. आणि आम्ही,साधं कळतं नाही आम्हाला.
असे खरात गावागावात आहेत. त्यापासून सावधान रहा. पोलीस बांधव तुमच्या पाठीशी आहेत. हक्काने त्यांना फोन करा. या भोंदू बाबांचा जाळ्यात अडकू नका., संविधानाचे वाचन करा, महापुरुषांचा विचार अंगीकारा असे झाले तर या भोंदूचा कपाळावर तुम्हचा नावाने आट्या पडतील.
निलेश झाडे


0 टिप्पण्या