शेवटी सभागृह बांधकामाचे भूमिपूजन उरकले : जागेवरून बरीच ओढताण



ग्रामीण तीर्थक्षेत्र योजनेतून २० लाखांचा निधी मंजूर.

गोंडपिपरी


खासदार प्रतिभा धानोरकर यांनी श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानास सभागृह बांधकामासाठी ग्रामीण तीर्थक्षेत्र योजनेतून २० लाखांचा निधी मंजूर केला .निधी मंजूर होऊन दोन महिने झाले मात्र सभागृहाची जागा निश्चित झाली नव्हती. संस्थेच्या विश्वस्तांमध्ये  जागेबाबत एकमत नसल्याची चर्चा होती. शेवटी मंगळवाराला सभागृहाचे भूमिपूजन झाले खरे मात्र जागेला घेऊन रुसवे फुगवे असल्याची माहिती आहे.

महाराष्ट्रातील विदर्भासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या संतनगरी धाबा येथील श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थानाला तीर्थस्थळाचा ' ब ' दर्जा मिळाला. ही मोठी उपलब्धी ठरली आहे.

 श्री संत परमहंस कोंडय्या महाराज यांचा जन्म जयंती महोत्सव दरवर्षी धाबा येथे साजरा करण्यात येतो. यानिमित्तान विदर्भासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील भाविक लाखोचा संख्येने येथे येत असतात.या यात्रेला होणाऱ्या गर्दीचे स्वरूप पाहता, सद्यस्थितीत देवस्थानकडे असलेल्या सभागृहाची जागा कमी पडत आहे. नवीन सभागृह बांधकामकरिता देवस्थान समितीच्या वतीने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडे निधीची मागणी करण्यात आली होती . या मागणीचा पाठपुरावा करून नवीन सभागृहाच्या बांधकामाकरिता ग्रामीण तीर्थक्षेत्र योजनेतून २० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून भाविकाकरिता भव्य सभागृह निर्माण करण्यात येणार असून, त्याचे भूमिपूजन मंगळवारला संपन्न झाले.भूमिपूजन सोहळ्याला देवस्थानचे अध्यक्ष सुहास माडूरवार, विश्वस्त अशोक रेचणकर, अनिल कोरडे, महेश सोनाकुलवार, तुळशीदास शेगमवार महाराज, व्यवस्थापक हनुमंत चंदनगिरीवार, कोंडय्या महाराजांचे नातजावई विजय मोदी, ओम साई पंडित, नैतिक मोदी, वेद पंडित यांची उपस्थिती होती.

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या