उत्कृष्ट कामगिरी करणारे पोलीस निरीक्षक बाजूला,आता चित्र बदलणार का?

 



चंद्रपूर 


 खरंतर प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा तसा तुटवडा असतो, त्यात एखाद्याने चमकदार कामगिरी केली तर त्याचा सन्मान व्हायला हवा. मात्र चंद्रपूर पोलीस विभागात चित्र उलट सुरू आहे. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस निरीक्षकाला मागील वर्ष भरा पासून  बाजूला बसविल्या गेले आहे तर दुसरीकडे मागील पाच वर्षांपासून एक पोलीस निरीक्षक एकाच विभागात ठाण मांडून आहे. एक अधिकारी एकाच ठिकाणी पाच वर्ष राहू शकतो का? जेव्हा की त्या निरीक्षकाचा कार्यपद्धतीवर अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. आता नवे पोलीस अधीक्षकांनी जिल्हाचे सूत्र हाती घेतले आहे. ते हे चित्र बदलवितात काय, याकडे चंद्रपूर करांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था डगमगली असून कुठलीही मोठी कारवाई करण्यात आली नाही. जिल्ह्यात रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ मोठे वाहने उभी असतात त्यामुळे अनेक अपघात होत आहेत, शहरातील रस्त्यावरून वाहतूक करणे, रस्त्याने पाई चालणे अवघड झाले असून अपघातात ही मोठी वाढ झाली आहे. चंद्रपूर जिल्हात क्राईम रेट वाढला आहे. अमली पदार्थ सहजपणे जिल्हात एंट्री करीत असताना शस्त्र बाडगणाऱ्याची संख्या वाढल्याचे भीतीदायक चित्र आहे. डूब्लीकेट तब्बाकू चा ही सुळसुळाट आहे. ऑनलाईन सट्टेबाजीला उत आले असून यात जिल्हातील तरुणाई पुरती गुंतल्याचे बोलले जाते. हे चित्र बदलविण्यासाठी प्रामाणिक पोलीस कर्मचाऱ्यांची गरज आहे. चंद्रपूर पोलीस विभागात असे कर्मचारी हजारोच्या संख्येने आहेत. मात्र आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना मिळालेल्या वागणूकीने पोलीस विभागातूनच नाराजी पुढे आली होती. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकार्यांना बाजूला बसवून ठेवण्यात कुठला हेतू आहे. खरंतर त्यांचाकडे असलेल्या कौशल्याचा योग्य वापर पोलीस विभागाने करायला हवा होता. दुसरीकडे जिल्हाचा वाहतूक विभागात मागील पाच वर्षांपासून एकच निरीक्षक ठाण मांडून बसला आहे. अनेक कर्मचाऱ्यांना काही कारण नसताना व कर्मचाऱ्यांच काही न ऐकतां त्यांना सलग्न करण्यात आले आणि आता तर चक्क त्यांची बदली करण्यात आल्याने पोलीस विभागात एकच खळबळ उडाली आहे. जिल्ह्याचे नवे सूत्र हाती घेतलेले पोलीस अधीक्षक या सर्व गोष्टींवर लक्ष वेधतात की नजरअंदाज करतात या कडे सर्वांच लक्ष लागले आहे.


सिनिअर मागे, जुनिअर पुढे 

सिनिअर, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांना उप पोलीस स्टेशनंमध्ये पाठविल्या गेले आहे तर दुसरीकडे जुनिअर पोलीस अधिकाऱ्यांना मोठ्या आणि महत्वाचा पोलीस स्टेशनंची जवाबदारी दिल्या गेली असल्याचे चित्र आहे. पोलीस विभागाचे हे गणित अद्याप कुणालाही कळले नाही. किमान आता यात फेरबदल होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.


निलेश झाडे 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या