करंजी midc, संघर्ष विभागला



( फोटो संग्रहित )

“जोपर्यंत MIDC प्रकल्प पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यंत आंदोलन अधिक उग्र स्वरूप धारण करेल,” असा निर्धार गोंडपिपरी औद्योगिक संघर्ष कृतीसमितीने व्यक्त केला होता .याच समितीने “आपली शेती, आपला हक्क” या घोषणा दिल्या होत्या.“आमची संमती न घेता जमीन घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. हा आमच्या मूलभूत हक्कांवर थेट आघात आहे,” असा थेट इशारा दिला गेला. केव्हा तर गोंडपिपरी तालुक्यातील प्रस्तावित MIDC औद्योगिक क्षेत्राविरोधात दि.23 एप्रिलला तहसील कार्यालयावर समितीच्या पुढाकारात केलेल्या प्रशासना विरोधातील आंदोलनात हा संताप व्यक्त केला गेला होता. तेव्हा एकसंघ असलेली ही समिती आता दुभंगली आहे. विषय एकच असला तरी आता दोन समित्या संघर्ष करणार आहेत.खरंतर शेतकऱ्यांसाठी कुणी पुढे येत नाहीत.त्या बारा गावातील शेतकऱ्यांचे नशीब कि, प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते, निष्कलंक राजकीय नेते एकत्र आले होते.मात्र येथेही शेवटी विरजन पडलेच.पण फारच वाईट झाले असेही म्हणता येणार नाही. एक से भले दोन. एकापेक्षा दोघांची ताकद अधिकच असते. तेव्हा बळीराजाला न्याय आता मिळणार हे, लोहयुक्त दगडावरील काळी रेघ समजू या...! 

पहिली शेतकरी परिषद...!

गोंडपिपरी औद्योगिक संघर्ष कृती समिती अस्तित्वात आहे. आता दुसरी समिती अस्तित्वात येणार आहे. या समितीचे नाव असेल ' शेतकरी एकता संघर्ष समिती '. या समितीची आज पत्रकार परिषदेत घोषणा होणार आहे. दिनांक 30 एप्रिल पासून 5 मे पर्यंत या समितीने करंजी, वढोली, चेक पेल्लूर, वडकुली, चक वडकुली, सिरसी देऊळवार, चक बेरडी, बोरगाव, धानापूर, चेक बोरगाव, लिखितवाडा व खरारपेठ या 12 गावात समित्या स्थापन केल्या आहेत. 8 मे ला ही समिती ' पहिली शेतकरी परिषद ' घेणार आहे.गोंडपिपरी औद्योगिक संघर्ष कृती समितीत सहभाग असलेले काही व्यक्ती बाहेर पडलेत. त्यांनी शेतकरी एकता संघर्ष समिती स्थापन केली आहे.


निलेश झाडे 

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या