' दादा ' नी लाखो जीव वाचविले, चला नाणेतुला करू या...!.




कन्हारगाव अभयारण्याचा विस्तार हजारो हेक्टरमध्ये आहे.येथे वाघ, बिबट यांची संख्या आणि दुर्मिळ जीवांचा अधिवास आहे.या वनक्षेतत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे. या अभयारण्यात आवास करणाऱ्या लाखो जीवाना आणि येथील वनसंपत्ती सुरक्षित केली आमच्या लाडक्या ' दादा ' नी.

एके दिवशी दादा तोहोगाव-कोठारी दौऱ्यावर असताना त्यांना या मार्गांवर वनवा दिसला. ( मार्गाचा लागत आग दिसली ) एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी ही आग विजविण्याचा प्रयत्न केला, समंधित विभागाला सूचना केली. विभागाचे कर्मचारी आलेत, त्यांनी आग विझविली.रस्त्याच्या कडेला लागलेली आग म्हणे पूर्ण कन्हारगाव अभयारण्याला गिळली असती. आमच्या धाबा-डोगरगाव मार्गांवरील डोंगरीवर रोज असा वनवा असतो.


खरा प्रश्न असा दादांनी ही आग अंगावरील कपडे काढून विझविली कि लोटांगण घालून ? कि तोंडानी फुकं मारून? काहीपण! दादानी जे कार्य केलं, त्यातून त्यांनी आपल्या जागरूकतेची प्रचिती दिली. त्यांनी हे सहज केले. याला मसाला लावण्याची काही गरज होती का? मसाला लावल्याने त्यांचे साधे मात्र तळमळीने केलेल्या कार्यावर बोट ठेवल्या गेले. बरं ज्याने हा मसाला लावला त्याला काय मिळालं असेल? भविष्यात काय मिळणार आहे? स्वतःची दादाबद्दल असलेली निष्ठा दाखविण्याचा नादात गळी तोंडघशी पडला. असो..! जे घडलं, जे बघितलं तेच लिहा... तेच सांगा... मसाला लावला तर तुम्हचे काही जात नाही समोरच्यांनी केलेले चांगल्या कार्यावर प्रश्नाचे काळेकुट्ट ढग पसरले हातात.


निलेश झाडे

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या