खरंतर मंदिरात भांडण नकोच. भांडण झाले तर त्याचे दोन कारण असतात. एक राजकारण आणि दुसरं पैसा. या दोन पैकी श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान संस्थेत राजकारण हावी झालं कि पैसा कळायला मार्ग नाही.मागील दोन मासिक सभा पोलीस स्वरक्षणात झाले. अजून अनेक गोष्टी बाहेर यायचा आहेत. मात्र पोलिसांना घेऊन सभा घेत असल्याने या संस्थेत काहीतरी फार मोठे झाल्याची चर्चा आता रंगली आहे.
दोन राज्यातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत परमहंस कोंडय्या महाराज देवस्थान संस्थेची पहिली आणि दुसरी विशेष सभा चर्चेचा विषय ठरली आहे. या सभेसाठी संस्थांनने चक्क पोलीस सुरक्षा मागवीली . या आधी असं कधीच घडलं नव्हतं.नेमकं आता काय घडलं ? संस्थेचे अध्यक्ष, सचिव बोलायला तयार नाहीत. विश्वस्त तोंडात जे आलं ते बोलतात. याचा अर्थ भाविकांना अद्याप कळलं नाही. दरम्यान या संस्थेत फार मोठा घोळ झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही संस्था रद्द करण्यासाठी शेकडो भाविकांनी पुढाकार घेतल्याची माहिती आहे. तसेच मंदिर सुद्धा ताब्यात घेण्याच्या हालचाली वाढल्या आहेत. योगायोगाने तसं झालं तर संस्था आणि मंदिर दोन्ही सुरक्षित राहतील असे बोलले जात आहे.

