विष टाकलं, शेकडो मासोळ्या मृत शेतकऱ्याचे मोठे नुकसान




पावसाचा लपंडावामुळे बळीराजावर दुबार पेरणीचे संकट आले. यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. या संकटाशी दोन हात करणाऱ्या रमेश ठुसे या शेतकऱ्याचा शेत तळ्यात अज्ञात व्यक्तीने विष कालवलं. त्यामुळे हजारो मासे मृत झाले.ठुसे यांचे लाखोचे नुकसान झाले आहे.ठुसे यांची शेती धाबा-पोडसा मार्गाला लागून आहे. त्यांचा शेत तळ्यात जनावरे आपली तहान भागवीत असतात. भविष्यात शेतकऱ्यांचे धन असलेले पाळीव जनावरे दगावू शकण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान ठुसे यांनी धाबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.


संतनगरी अशी ओडख असलेल्या धाबा गावात रमेश ठुसे यांची तीन एकर शेती आहे. त्यांची शेती धाबा-पोडसा राज्य मार्गाला लागून आहे. या शेतातील शेत तळ्यात ते दरवर्षी विविध प्रजातीचे मास्याचे उत्पादन घेत असतात.मागील वर्षीचे जवळपास दोन क्विंटलचे मासे त्यांचा शेत तळ्यात होते. एक महिन्यानंतर ठुसे मासे विक्रीला काढणार होते. मात्र गुरुवारचा रात्री मासेचोरांनी शेत तळ्यात विषारी द्रव्य टाकलं. त्यामुळे तळ्यातील शेकडो मासांच्या मृत्यू झाला आहे. यामुळे ठुसे यांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान ठुसे यांनी धाबा उप पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांचा तपास सुरु आहे.

Reactions

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या