काँग्रेस नेत्याची मुजोरी, महिलेशी अरेरावी, धाबा पोलिसांची कार्यवाही संशयास्पद




निलेश झाडे 



काँग्रेस पक्ष गरीब आहे... काँग्रेस पक्षाचे नेते मात्र अमीर आहेत, राहुल गांधी 


स्वतःला काँग्रेसचा नेता म्हणवीणारा शंकर नावाचा हा हिवरा येथील स्वयंभू नेता खरंतर गावगुंड आहे. काँग्रेस नेता असल्याचा आव आणित हा अवैध धंदे करतो. आता मात्र याने केलेली कृती फारच संतापजनक आहे. एका महिलेने शेतात नागरणी करण्यासाठी नांगर जुंपले होते. या शंकरने ते नांगर काढून फेकून दिले. महिलेला शिवीगाळ केली. मारहान केल्याचा त्या महिलेचा आरोप आहे. हा वाद शेतीचा धुर्यातून झालेला आहे. मात्र स्वतःला समाजसेवक, गावनेता म्हणावीणाऱ्या या नेत्याने थेट महिलेचा अंगावर धाव घेतली. माझं कुणीच वाकडं करू शकत नाही, असा तो बोलला असल्याचे महिलेचे म्हणणे आहे. ही हिंमत येते कुठून? काँग्रेसचे मोठे नेते त्याला ही हिंमत पुरवीत आहेत काय? गरिबांचा अनेक योजना स्वतःचा घश्यात घालणाऱ्या या गावगुंडाला कोण प्रोटेक्शन देत आहे. हा खरा प्रश्न आहे.



जर ती महिला चुकली होती तर एक नेता, सामाजिक कार्यकर्ता म्हणून काय पाऊल उचलायला हवं होतं. त्याने तंटामुक्त समितीकडे आपली समस्या मांडायला हवी होती. तिथे प्रश्न सुटला नसता तर पोलीस स्टेशनला जायला हवं होतं. पण थेट अंगावर धावून जाणे ही मुजोरी आहे.


धाबा पोलीस स्टेशनमध्ये ती महिला गेली. तिने व्हिडिओ दाखवला. त्याने मारहाण केल्याचे सांगितलं. धाबा पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा शंकरने धमकी दिलं असं तिचं म्हणणं आहे. धाबा पोलिसांनी काय केले? एकतर तिचे ऐकले नाही. आणि त्या महिलेवर सुद्धा प्रतिबंधनात्मक कारवाई केली. एका गावगुंड नेत्याला धाबा पोलीस घाबरले. पोलिसांनी तोंड बघून कारवाई करू नये. सत्याचा बाजूने त्यांनी उभे असायला हवे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने