गोंडपिपरी
‘विकसित भारत @2047’ हा दूरदृष्टीचा संकल्पाला पुढे ठेवून, सेवा संकल्प अभियानांतर्गत भाजपा गोंडपिपरी तालुका मंडळाच्या वतीने ‘संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा’ या कार्यक्रमाचे आज ( बुधवार दि. 7 ऑक्टोंबर ) आयोजन केले.या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला.राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगडे या वेळी उपस्थित होते.गेल्या अडीच दशकांत मा. मोदीजींनी आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने भारताला जागतिक पटलावर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या मंत्रावर चालत असताना, देशातील कोट्यवधी माता-भगिनी, शेतकरी, तरुण आणि वंचितांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणाऱ्या अनेक कल्याणकारी योजना आज घराघरांपर्यंत पोहोचल्या आहेत.
महाराष्ट्राच्या दृष्टीने विचार केल्यास, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून राज्याचा आणि विशेषतः आपल्या राजुरा विधानसभा मतदारसंघाचा होत असलेला विकास हा याच राष्ट्रसेवेचा परिपाक आहे, असे आमदार भोंगडे म्हणालेत.
पुढे ते म्हणालेत,राजुरा विधानसभा मतदारसंघाचा होत असलेला विकास हा याच राष्ट्रसेवेचा परिपाक आहे. आजचा हा ‘विकसित भारत @2047’ चा संकल्प केवळ एक स्वप्न नसून, येत्या काळात भारताला महासत्ता बनवण्याचा प्रत्येक भारतीयाचा सामूहिक निश्चय आहे.
तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जि.प. सदस्य अमर बोडलावार, शहराध्यक्ष चेतन गौर, महामंत्री निलेश पुलगमकार, निलेश संगमवार, नगराध्यक्षा अश्विनी तोडासे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष राकेश पून, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धुडसे, उपसभापती स्वप्नील अनमूलवार, रमेश दिंगलवार, भानेश येग्गेवार, वैभव बोनगीरवार, सतीश वासमवार, प्रवीण धोडरे, गणेश डहाळे, राकेश साकलवार, शिथिल लोणारे, सुहास माडुरवार, अमित येगिनवार, जितेश येगिनवार, समीर निमगडे, गणेश मेरुगवार, बबन शेख, मनोज वनकर, रियाज कुरेशी, बाळू झाडे, सुरेखा श्रीकोंडावार, वैष्णवी बोडलावार, रोशनी अनमूलवार, तेजस्विनी भगत, सारिका मडावी, कलावती पुप्पलवार यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.


