सोंगाड्याना खुर्ची मिळत नाही....




निलेश झाडे 


आज एक बातमी वाचली.गोसिखुर्दचा कालवा गोंडपिपरी तालुक्यात वळता करा. मागणी लईच भारी. आज पर्यंत अशी मागणी करायला हवी होती असा विचार यांच्या डोक्यात का आला नसेल बरे ? ते राहतात गोंडपिपरी तालुक्याचा बाहेर, आता गोंडपिपरी तालुक्यातील एका गावाचे मतदार झाले आहेत. मतदार होताच त्यांना तालुक्याचा मागासलेपणा दिसू लागला.यांना आता झोपच लागेना.हल्ली ते आता गटारात तोंड खुपसून विकासाचा सूर्यदेवाला विनंती करीत सुटले आहेत ,विकासाचा उजेड इथे पसरव रे बाबा..!  सध्या त्यांनी ध्यान लावले आहे, केवळ उजेड नको विकासाचा सूर्यदेवा तू गोंडपिपरी तालुक्यातूनच उगव. हे नुसते सोंग आहेत, हे सोंग त्यांनी का घेतले? सांगायला नको. घरात मंत्रिपद असतात गोंडपिपरी तालुक्यासाठी त्यांनी काय केले ? स्वतःला भूमिपुत्र म्हणवून घेतल्याने कुणी भूमिपुत्र होत नाही. येथील भूमिशी, मातीशी एकरूप झालेला माणूस खरा भूमिपुत्र असतो.आता त्यांनी सोंग घेतले आहे.


यांचा दोष नाहीच. यांना डोक्यावर घेऊन नाचणाऱ्यांरे खरे विकास विरोधी आहेत. तुम्ही कुठल्या राजकीय पक्षात आहात, हरकत नाही. मात्र जेव्हा गावाचा, तालुक्याचा विकासाचा प्रश्न असतो तेव्हा सर्वांनी एक व्हायला हवे. मंत्री असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील एका भूमीपुत्राने त्यांचा क्षेत्रात होणाऱ्या लोहखाणीला समर्थन दिले आणि गोंडपिपरी तालुक्यातील midc ला विरोध केला. हा दोगलेपणा आहे. तुम्हच्या क्षेत्रात काही करून विकास हवा आणि आमच्या क्षेत्रात होणाऱ्या विकासाला विरोध करायचा.midc ला जनतेतून विरोध सुरु झाला होता. यांनी तिथे नाक खूपसविण्याची काही गरज नव्हती.


जो व्यक्ती गोंडपिपरी तालुक्याचा रहिवाशी नाही तो तालुक्याचा मतदार झाला . हा आटापीटा कश्यासाठी ? निवडणूक जवळ आली की असे सोंगाडे जन्मास येतात. यांचे आयुष्य फारच अल्प असते. याचा प्रत्यय उंटावर बसून गवत खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या बालबुद्धी बालकला येवो, अशी अपेक्षा.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने