निमगडेनी मोजले खड्डे : जिवघेण्या मार्गाचा प्रश्न उचलून धरला : तर आंदोलन





गोंडपिपरी 


असे म्हटले जाते की रस्त्यावरून गाव विकासाचा चेहरा कळतोय.हा मार्ग तुम्ही बघीतला की गोंडपिपरी तालुक्याचा मागासलेपणाचा धूळ किती दाट आहे, याचा साक्षात्कार तुम्हाला होईल.हा मार्ग आहे चंद्रपूर - अहेरी.खरंतर नावाला राष्ट्रीय महामार्ग असलेल्या या मार्गांवर करंजी ते गोंडपिपरी या केवळ सात किलोमीटर अंतरात मोजून सतरा जीवघेणे खड्डे आहेत.प्रवाश्याना ये - जा करताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अपघाताचे प्रमाण वाढले आहे.एवढ्या गंभीर समस्याकडे मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.यामुळे तातडीने खड्डे बुजवा,अन्यथा आंदोलन उभारू,असा ईशारा कृउबाचे संचालक समीर निमगडे आणि करंजी गावातील युवकांनी दिला आहे.




चंद्रपूर - अहेरी हा राष्ट्रीय महामार्ग आता भरधाव वाहू लागला आहे.या मार्गावरून सुरजागडच्या कच्च्या मालाची वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते.रोडच्या क्षमतेपेक्षा अधिक आणि अवजड वजनाची वाहतूक असल्यामुळे या महामार्गाची ऐशीतैशी झाली आहे.अनेक ठिकाणी भेगा पडल्या आहेत,तर काही ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याचे पाहायला मिळते.हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत.याच मार्गावर असलेल्या करंजी ते गोंडपिपरी या ७ किलोमीटरच्या मार्गावर १७ खड्डे पडल्याचे दृश्य आहे.नियमित वर्दळीच्या या मार्गावरून शाळकरी विद्यार्थ्यांसह आबालवृद्धांची ये - जा सुरू असते.खड्ड्यामुळे जीव मुठीत धरून प्रवासी यातायात करतात.यामुळे तातडीने खड्डे बुजवण्याची मागणी जोर धरत आहे.या संबंधातील निवेदन उद्या सोमवारी गोंडपिपरीचे तहसीलदार आणि ठाणेदारामार्फतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाला देण्यात येणार आहे.या शिष्टमंडळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समीर निमगडे,सामाजिक कार्यकर्ते सागर आल्लूरवार,राकेश चापले,निखिल बामणे,बादल देऊरमल्ले,प्रशांत भडके,पुरुषोत्तम पेंढारकर आदींचा समावेश राहणार आहे.तातडीने या मार्गावरील खड्डे बुजवा अन्यथा रस्त्यावर उतरू अश्या आशयचे निवेदन उदयाला  शिष्टमंडळ देणार आहे.






सुरक्षारक्षक गेले कुठे ?


सतत वर्दळ असलेल्या या मार्गावर सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली.भरधाव जाणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवणे,दिशादर्शक सूचना आदीसाठी नियमित दिसणारे सुरक्षारक्षक आता दिसेनासे झाले आहेत.जनसामान्यांच्या सुरक्षिततेसाठी या मार्गावर सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.



पोलीस कर्मचाऱ्यानी बुजविला खड्डा.. 



पोलीस म्हटलं की खाकी वर्दीतला कठोर माणूस,अशी सामान्य भावना असते,मात्र गोंडपिपरी ठाण्याअंतर्गत एका पोलीसानी या मार्गावरील खड्डा स्वतः बुजविल्याचे आश्यादायी आणि संवेदनशील चित्र काही दिवसापूर्वी पाहायला मिळाले.यामुळे महामार्ग विभाग करतो तरी काय ? हा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.


देखभाल दुरुस्तीची यंत्रणा काय करते ?


काही वर्षांपूर्वी बालाजी कंन्स्ट्रक्शन कंपनीकडून बामणी ते नवेगाव वाघाडे या राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात आले.मात्र सद्यस्थितीत या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याचे चित्र आहे.हे खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत.यामुळे देखभाल दुरुस्तीकडे महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने