चंद्रपूर
विरोधक अधूनमधून काँग्रेसवर परिवार वादाची टीका करीत असतात. चंद्रपुरात मात्र परिवारवाद मागे पडला अन काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे स्व जातीवरील प्रेम उतू लागल्याची टीका काँग्रेस कार्यकर्ते करू लागले आहेत.माजी आमदार सुभाष धोटे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपवल्या गेली.त्यांचाच परिवारातील शंतनू धोटे यांना युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षाची जवाबदारी दिल्या गेली.आता महिला जिल्हाध्यक्षपद ॲड.कुंदा जेणेकर यांच्याकडे सोपविल्या गेली आहे.यात विशेष म्हणजे हे तिघेही राजुरा तालुक्यातील आहेत.कुणबी जातीचे ते प्रतिनिधित्व करतात. काँगेसला पक्षातील दलित,आदिवासी,ओबीसीतील अन्य जातीतील सक्रिय कार्यकर्ते दिसत नाही काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.जिल्हात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे उतू आलेलं स्व जातीचे प्रेम पक्षाला मारक ठरणारे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
काँग्रेस पक्षाला पुरोगामी विचाराचे म्हटलं जाते. देश्यातील सर्वात मोठा आणि आता दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या या पक्षांवर परिवार वादाची टीका सारखी केल्या जाते.चंद्रपूरातील काँग्रेस नेत्यांचे प्रेम आप्त जणांसाठी आणि स्व जातीसाठी उतू लागेल्याचे सध्या चित्र आहे.
खासदार धानोरकरांचा अट्टाहास नडला
विधानसभा निवडणुकीत प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलून वरोरा विधानसभा क्षेत्राची उमेदवारी प्रवीण काकडे यांना दिल्या गेली. खासदार प्रतिभा धानोरकर यांचे ते भाऊ आहेत.निवडणुकीत धानोरकरांचा भाऊ आपटला. खरंतर एखाद्या प्रामाणिक कार्यकर्त्याला ही उमेदवारी द्यायला हवी होती. खासदार धानोरकरांचे बंधू प्रेम काँग्रेस पक्षाला नडले.असे बोलले जात आहे.
धोटे काँग्रेसचा जहाज घेऊन डूबणार
जिल्हा काँग्रेस अध्यक्षपद सुभाष धोटे यांच्याकडे आले.धोटे यांनी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतली.अन धोटे परिवारातील शंतनू धोटे युवक काँग्रेसचे अध्यक्ष झालेत.दोन अध्यक्ष पद मिळाल्यावरही धोटे यांचे समाधान झाले नाही, अशी चर्चा त्यांचाच पक्षातून पुढे आली.आता धोटे यांच्या राजुरा तालुक्यातील ॲड.कुंदा जेणेकर यांच्याकडे काँग्रेसने महिला जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. तीन महत्वाची पदे एका जातीकडे आणि एकाच तालुक्यात दिल्याने काँग्रेसवर समाज माध्यमातून टीका केली जात आहे.
दलित, आदीवासी नाराज
कुणबी,मुस्लीम समाजाला नियुक्त्यांमध्ये काँग्रेसने प्राधान्य दिले.पक्षातील दलित, आदिवासी समाजाला हेतू पुरस्कर डावलल्याचा सुर पक्षातून पुढे येत आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही समाज काँग्रेसच्या पाठीशी उभे असतात. काँग्रेसचे सध्याचे धोरण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मारक ठरणारे असल्याचे बोलले जात आहे.


0 टिप्पण्या