गोंडपिपरी
खरंतर गोंडपिपरी तालुक्याचा नऊ ऑक्टोबरच्या यादीत समावेश होता.एका रात्रीतून अतिवृष्टी बाधित तालुक्याचा यादीतून गोंडपिपरीचे नाव दिसेनासे झाले.या दरम्यान आंदोलने झाली, आमदार देवराव भोंगळे यांच्यावर टीका झाली.मात्र टिकेकडे दुर्लक्ष करीत ' दादा ' ने तालुक्याचा शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. अतिवृष्टीच्या यादीत गोंडपिपरी तालुक्याचा समावेश झाला आहे.पत्रकार परिषद घेत ' दादाचा वादा, पक्का वादा ' असे भाजपने सांगितले.
आमदार देवराव भोंगळे गोंडपिपरीचे जावई. त्यामुळे तालुक्याचा विकासाबाबत भोंगळे यांच्याकडून अपेक्षा वाढल्या. या अपेक्षाची पूर्तता करीत असताना गोंडपिपरी तालुक्याचे नाव अतिवृष्टीच्या यादीतून गायब झाले. त्यामुळे तालुक्यात नाराजी पसरली.या विषयाला घेऊन टिकेची तोफ डागल्या गेली. उपोषण, आंदोलनाचा इशारा दिला गेला. शेवटी तालुक्याचे नाव यादीत आणण्यात आमदार देवराव भोंगळे यशस्वी झालेत. आज गोंडपिपरी येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत दादांनी वादा निभावीला असे भाजपचे तालुका अध्यक्ष दीपक सातपुते यांनी सांगितले. यावेळी भाजप नेते अमरभाऊ बोडलावार,दीपक बोनगीरवार,सरपंच निलेश पुलगमकार, चेतन गौर, निलेश संगमवार, राकेश पून,भानेश येगेवार, हिरा कांदिकूरवार, वैभव बोनगीरवार, गणेश मेरूगवार, अण्णा, विनोद पाल उपस्थित होते.
सर्व शेतकऱ्यांना मिळणार लाभ
केवळ नदिकाठावरील बाधित झालेली शेती नाही तर अती पावसामुळे शेत पिकांचे नुकसान झाले असेल तर त्या शेतकऱ्यांनाही आता लाभ मिळणार आहे, असे दीपक सातपुते यांनी सांगितले. पुढे सातपुते म्हणाले,समाजमाध्यमातून होणाऱ्या टिकेला उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. विरोधकांना उत्तरे देत बसण्यापेक्षा आम्ही कार्याला अधिक महत्व देतो.
मी समाजसेवक, जनतेसाठी राबणारा
करंजी जिल्हा परिषद क्षेत्रातून राज्यातील एका मोठया नेत्यांची कन्या उभी राहणार असल्याची चर्चा आहे. याच मतदार संघातून अमरभाऊ बोडलावर यांच्या पत्नी वैष्णवी बोडलावार यांचे नाव चर्चेत. यावर प्रश्न विचारला असता बोडलावार म्हणाले मी बारा महिने समाजसेवा करणारा माणूस आहे. माझे कार्य तालुक्याला परिचित आहे. कुणीही आला तरी आम्हाला जराही फरक पडणार नाही.


0 टिप्पण्या