चंद्रपूर
राज्यातील शेवटचा टोकावर असलेल्या राजुरा विधानसभा क्षेत्र सध्या चर्चेत आहे. बोगस मतदार प्रकरण गाजत असताना आमदार देवराव भोंगळे यांच्या नाचत असलेला फोटो समाजमाध्यमात वायरलं झाला आहे. अतिवृष्टीचा मदतीतून राजुरा विधानसभा क्षेत्रात येणारा गोंडपिपरी तालुका वगळला गेला. खनिज निधीतून तालुक्याचे नाव गायब आहे.शेतकऱ्यांचा डोळ्यातून अश्रूचा पूर वाहत असतानादिवाळीत वाघाचा हल्ल्यात शेतकऱ्याचा जीव गेला. यावर बोलताना आमदार भोंगळे दिसत नाही. त्यात नाचत असतानाचा फोटो पुढे आल्याने असा देव नकोय अश्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत.
मागासपनाची मळकट चादर ओढून कुतत कुतत चाललेला तालुका अशी गोंडपिपरी तालुक्याची ओळख आहे.तालुक्याचा विकासाकडे लोकप्रतिनिधीचे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत असतो. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीत शेतीला मोठा फटका बसला. मदतीचा यादीत तालुक्याचे नाव होते मात्र एका रात्रीतून नाव वगळल्या गेले. बळीराजा संताप व्यक्त करीत असताना वाघाने शेतकऱ्याचा शरीराचे अक्षरस तुकडे केले.शेतकऱ्यावर संकट ओढावले असताना आमदार देवराव भोंगळे हसू हसू नाचतानाचा फोटो वायरलं झाला. खरंतर आमदार म्हणून भोंगळे शेतकऱ्यांचा पाठीशी उभे असायला हवे होते.मात्र ते आनंदात नाचताना दिसल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
त्यांना मनोरंजन हवे, माजी आमदार धोटे
काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांनी आमदार भोंगळेवर निशाणा साधला.शेतकरी संकटात असताना आमदार मात्र सांस्कृतिक कार्यक्रमात नाचताना दिसत आहेत.जनतेच्या प्रश्नांपेक्षा आमदारांना मनोरंजन अधिक महत्वाचे वाटते अशी बोचरी टीका धोटे यांनी केली.


0 टिप्पण्या