हातात ' गोटे ' कश्यासाठी ? लाथा मारल्याने वाऱ्याला इजा होत नाही




 तालुक्याचे नाव अतिवृष्टीचा यादीत समावेश झाले. खरंतर हा आनंदा क्षण. कुणाचा ओरडण्याने झाले, की कुणी वादा निभावीला हे जनता ठराविणार आहे. सध्याचे चित्र असे की, क्षेयवादाचा आखाड्यात दोन राजकीय पक्ष हू तू तू खेळताना दिसत आहेत. यात नवल काय? राजकारणात सत्ताधाराची तंगडी विरोधकांच्या हातात असते, विरोधकांची तंगडी सत्ताधाऱ्यांच्या हातात असते.हे चालायचंच.भाजपने पत्रकार परिषद घेतली.दादाने वादा निभावीला असा सूर लावला.त्या बातम्या पत्रकारानी प्रसिद्ध केल्यात. विरोधकांनी आंदोलने केली, मागण्या लावून धरल्यात,त्याही बातम्या प्रसिद्ध झाल्यात. मात्र ' कोवळ्या ' बुद्धीच्या एका अध्यक्षानी थेट मीडियावर गोटे फेकलेत.' विकलेल्या पत्रकारांचा बातम्या ' असा आरोप त्यांनी केला. एका पोर्टलने ते छापलं.याला काय म्हणायचे? कदाचित हे त्यांचे अनुभवाचे बोल असतील.

ज्या ' कोवळ्या ' मुलाने ही चिखलफेक केली. त्यांचा परिवारात जेष्ठ राजकारणी आहेत. राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांचा राजकीय कारगिर्दीत असे लाखो प्रसंग आले असतील की पत्रकारानी त्यांना तिखट प्रश्न विचारले असतील. त्यांनी केलेल्या एखाद्या कामाचे क्षेय विरोधकांनी घेतलं असेलं. पत्रकारांनी बातम्या लिहिल्या म्हणून ते पत्रकारावर भडकले असे ऐकिवात नाही.अधिकार वाणीने त्यांनी एखादा पत्रकाराला बोललं असेलही मात्र जाहीररित्या पत्रकारांवर त्यांनी चुकीची टिप्पणी केलेली नाही. आज ते सत्तेत नसले तरी त्यांचा सन्मान टिकून आहे.

नवं रक्ताला ओहटी, भरती लवकर येते, हे खरे म्हणून उचलली जीभ लावायची टाळूला? वाऱ्यावर लाथा मारल्याने वाऱ्याला इजा होत नाही आणि चिमणीच्या खोप्यात बसून नुसती दिव्यत्वाची चर्चा केल्याने दिव्यत्व मिळत नाही.कुणी वंदा, कुणी निंदा लोकसेवेचा अम्हूचा एकच धंदा, या तत्वाने राजकारनी चालायला हवे.संतांनी म्हटलं, निंदाकाचे घर असावे शेजारी पत्रकार निंदक असतात.काही पत्रकार राजकारणात सुद्धा आता आले आहेत.तुझ्या वाचून करमेना, पण तुझं माझं जमेना, असं नातं राजकारणी आणि पत्रकारांचे असते.


शेवटी राजकारनी आणि पत्रकारांना लागू होणाऱ्या ओळी 


तेरा मेरा शिसे का घर, मै भी सोचू तू भी सोच 

क्यू दोनो के हात मे पत्थर,मै भी सोचू तू भी सोच


निलेश झाडे 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या