जंगलाचा राजाने अशी दहशत पसरविली की बळीराजा भीतीच्या काळ्या ढगात पुरता हरवीला आहे.देश्यात सर्वाधिक वाघ चंद्रपुरात आहेत. खरंतर ही सन्मानाची बाब. मात्र या वाघाना वाढविताना येथील जंगल, शेती अन गावे रक्ताळली.शेतात, घरात रक्त सांडलं. कुणाचा बाप हरवीला. आईचा मायेपासुन लेकरं कायमची मुकलीत. सात जन्म सोबत राहण्याचे ज्यांनी वचन घेतलं त्या पती, पत्नीची कायमची ताटातूट झाली. हे वाघाचा हल्ल्यामुळे. जिल्हातील वाघ विधवांचे दुःख असे की पाषाणालाही पाझर फुटावा.सरकार आर्थिक मदत करतेय. यातून आर्थिक प्रश्न सुटतात. मात्र मानसिक आधाराचे काय? कर्ता पुरुष, मायेचा स्पर्श यातुन मिळणार काय? हा खरा प्रश्न.
आता तर वाघामुळे दोन गावे सायंकाळला कुलूप बंद होतं आहेत.चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या गणेशपिपरी येथील अल्का पांडुरंग पेंदोर,चेकपिपरी येथील भाऊजी पाल यांच्या वाघाने बळी घेतला.बळी घेणारा वाघ शेतशिवारात ठाण मांडून आहे.वाघाची दहशत या दोन्ही गावात पसरली आहे. कधी रात्रीचे बारा वाजे पर्यंत जागे असणाऱ्या या गावात सायंकाळचा पाच वाजता समशान शांतता पसरत आहे. शेतात कापूस, धान पीक शेवटचा टप्यावर आला असताना शेतकऱ्यांनी शेतात जाणे बंद केले.
गावातील माणसेच नाही तर पाळीव जनावरे दहशतीत आहेत. त्यांना घरीच बांधून ठेवल्या जात आहे. रस्त्याने वाघ येतं असल्याने रस्त्याचा दोन्ही बाजूची झाडे झुडपे तोडण्यात आली. वाघाला जेरबंद करा ही गावकऱ्यांची मागणी. वनविभागाचा मोठा ताफा वाघावर नजर ठेवून आहे. मात्र वाघाला पकडण्यात वनविभागाला अद्याप यश आले नाही. त्यामुळे गावकऱ्यात संताप आहे.जिल्हात वाघाची संख्या वाढली हे अभिमानाने सरकार सांगते आहे. मात्र हे वाघच आता येथील बळीराजाचा जिवावर उठल्याचे चित्र आहे. वाघ आणि मानव संघर्ष होणार नाही, अश्या ठोस उपाय योजनाची गरज आता निर्माण झाली आहे.जंगलाचा राजा आणि बळीराजा खरे तर हे दोघेही राजे.एक राजा पोट भरण्यासाठी शेतात बळी घेत आहे. दुसरा राजा पोट भरणाऱ्या शेतापासून दूर आहे. ही मोठी शोकांतिका आहे.




0 टिप्पण्या