' वाघ वाचावा ' ही हाक सरकार, प्रशासनाने दिली. महाराष्ट्र राज्यातील किती गावापर्यंत हा हाकेचा आवाज गेला, याची माहिती नाही. मात्र चंद्रपूर जिल्हाने ही हाक ऐकली.आज देश्यात सर्वाधिक वाघ चंद्रपुरात आहे. ताडोबाला भेट देण्यासाठी देश-विदेश्यातील पर्यटक येतात. वाघाला कॅमेरा बंद करतात. त्याचे फोटो समाजमाध्यमात वायरलं करून प्रसिद्ध येतात आणि कमाई सुद्धा करतात. ज्यांनी या वाघांच्या सुरक्षेसाठी रक्त सांडवलं, ते परिवाराला घेऊन ताडोबा बघू शकत नाही. ताडोबा बघण्यासाठी लागणारा शुल्क सामान्य माणसांसाठी आटोक्यात राहिलाच नाही. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आंदोलन केलं. या आंदोलनातून जो मार्ग काढण्यात आला तेही जिल्हातील सामान्य माणसांना परवडणारा नाही.जिल्हात वाघाने ज्यांचा बळी घेतला ते शेतकरी, अतिशय सामान्य माणसे. हातात आणून पानावर खाणारे. वाघ-मानव संघर्षाची धग कमी करण्यासाठी केवळ आर्थिक मदत पुरेशी नाही. ठोस उपाययोजना हव्यात. दोन वर्षांपूर्वी वनविभागाने झटका मशीनची योजना आणली. सहा हजार रुपये शेतकऱ्यांना जमा करावे लागायचे. उर्वरित रक्कम वनविभाग द्यायचा. अतिशय लाभदायक या योजनेत पैसे कमविण्याचा मार्ग काही वन कर्मचाऱ्यांनी शोधला. झटका मशीन देणाऱ्या दुकानदारांशी संपर्क साधून कमिशन खिश्यात घातल्याचा अनेक बातम्या पुढे आल्यात. वनविभागाने नाव सुचविलेल्या दुकानातून घेतलेल्या किती झटका मशीन आज सुरु आहेत. याचा शोध वनविभागाने घ्यावा.
शेती उपयोगातील साधने जंगलात असतात.शेतकऱ्यांना त्याची नितांत गरज. एखादा शेतकरी ही साधने आणताना दिसला की वनविभाग त्याच्यावर हमखास कार्यवाही करतो. वन विभाग म्हणतोय जंगल आम्हचे. आता वाघाचा हल्ल्यात मनुष्य मनुष्यबळी जात आहेत. याचा विरोधात रस्त्यावर माणसे उतरली. हे का घडलं? याचा विचार वनविभागाने करण्याची आता गरज निर्माण झाली.
गोंडपिपरीत झालेलं आंदोलन खरंतर तालुक्यातील शेतकऱ्यांचे, गावाकऱ्यांचे होते. या आंदोलनात काही राजकीय चेहरे दिसलेत. गोंडपिपरी तालुक्याचे नागरिक म्हणून ते आलेत असावे. मात्र बारा महिने हे काय करतात? शेतकऱ्यांचा कुठल्या प्रश्नावर यांनी आंदोलन केलं.जे राज्यातील प्रश्न आहेत, त्याला घेऊन त्यांनी निवेदन दिलेत, फारफार आंदोलन केलेत.या आंदोलनातील गर्दी बघता गावनेत्यांचा सामान्य जनतेवर असलेल्या प्रभावाची प्रचिती येईल. तू लढो, हम चड्डी संभालते है. अशी तालुक्यातील गाव नेत्यांची स्थिती. याला अपवाद असलेल्या प्रामाणिक नेत्यांना प्रणाम. आता काय? हा खरा प्रश्न आहे. माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे, वनविभागाने गावकऱ्यांसोबत संवाद वाढवायला हवा. यातून संपूर्ण प्रश्न जरी सुटले नाहीत तरी सामान्य माणूस तुमच्या विरोधात उतरणार नाही. अटीतटीच्या प्रसंगी तुमच्या मदतीला हीच माणसे धावून येतील. आज जे जंगल दिसतंय, ते जंगल वन विभाग अस्तित्वात यायचा आधीपासून आहे. त्याचं संरक्षण इथल्या स्थानिक माणसांनी केलं. काही चुका घडल्या असतीलही मात्र जंगलाबद्दल ते प्रामाणिक राहिलेत. याचा सन्मान वन विभागाने करायला हवा. कदाचित यातून निघालेला मार्ग येथील जंगलवाटा पुन्हा हिरव्यागार करतील.
निलेश झाडे


0 टिप्पण्या