मुनगंटीवार म्हणाले, बाहेरच्यांनी घात केला,त्यांचं दुखणं काय?




चंद्रपूर


 खरंतर चंद्रपुरात भाजपला वाढविण्यात अनेक प्रामाणिक कार्यकत्यांचा हातभार लागला आहे.यात सुधीर मुनगंटीवार यांचा मोठा वाटा आहे.आज मुनगंटीवार भाजप पक्षातील काहींना नकोसे झाले आहेत.त्यांना अनुलेखांने ' संपविण्याचे कार्य भाजपचा एक गट करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.मुनगंटीवार यांच्या विधानसभेतील बल्हारपूर, मुल या दोन नगरपरिषदेचा निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला. माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार यांनी म्हटलं,ज्या प्रमाणे आम्ही दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश देत आहोत,त्याचा हा परिणाम आहे.कधी मुख्यमंत्री पदाचा स्पर्धेत असणाऱ्या मुनगंटीवार आज केवळ आमदार आहेत.त्यांचा बोलल्यातून

भाजपचाच एका गटाने मुनगंटीवारांना मात देण्यासाठी अंधारात गोटे फेकलेत.त्याला यश आले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.आपल्याच पक्षातील मंत्र्यांना धारेवर धरणारे मुनगंटीवार नगरपरिषदेचा पराभवाने खचले की राखेतून गगन भरारी घेणाऱ्या फिनिक्स पक्षांप्रमाणे पुन्हा उभे होतात. हे येत्या काळात दिसणार आहे.

 

मुनगंटीवार यांच्या विधानसभेतील बल्हारपूर, मुल या नगरपरिषदेचा निकाल लागला.या निकालाने मुनगंटीवार आणि त्यांचा समर्थकांना हादरे दिले. कधी भाजप म्हणजे मुनगंटीवार असं समीकरण जिल्ह्यात होतं. त्याच मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील दोन नगरपरिषदा काँग्रेसकडे गेल्यात.खरंतर भाजप-काँग्रेस पक्षात थेट लढतीचे चित्र होते. मात्र मूल आणि बल्हारपुरात भाजप विरुद्ध भाजप काहीसं असं चित्र होतं.भाजपातील अंतर्गत संघर्ष टोकावर गेल्याचे यातून दिसले.आमदार मुनगंटीवार यांनी आपल्याच पक्षातील मंत्र्यांना धारेवर धरल्याचे हिवाळी अधिवेशानात दिसून आले.केवळ जिल्हातील काही भाजप नेत्यांना नाहीच तर राज्यातील नेत्यांना मुनगंटीवार नकोसे झाले होते.मुनगंटीवार यांना पराभवची जाणीव झाली असावी, म्हणूनच त्यांनी बाहेरच्यांना दार खुले करण्याचा हा परिणाम अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.


 बाहेरचे कोण ...


अहिर-मुनगंटीवार याच्यातील मतभेद अनेकदा पुढे आले आहेत. भाजपचा वरिष्ठ नेत्यांनी या दोघात मनोमिलन घडविण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. याच दरम्यान आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजप प्रवेश केला. जोरगेवार नको असा हट्ट मुनगंटीवार यांनी धरला होता. मात्र जोरगेवार यांनी मुनगंटीवार यांना मात देत भाजपात प्रवेश घेतला.जोरगेवार यांच्या सोबत माजी मंत्री हंसराज अहिर दिसत होते.जोरगेवार यांनी केवळ चंद्रपूर शहरातील कार्यकर्ते आपल्याकडे वढविले नाही तर राज्यातील भाजप नेत्यांचे ते निकटवर्ती झाले असं बोललं जाते.मुनगंटीवार यांनी ज्यांना बाहेरचे म्हटले ते कोण? हा काही शोधाचा विषय नाही. त्यांचे बोट जोरगेवार यांच्याकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या