विनपरवानगी जिनिंग बांधकाम करणाऱ्या व्यायसायिकाची मुजोरी
गोंडपिपरी:-
जादा पैसा कमविण्याच्या नादात नियमांची ऐसीतैसी करण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेेत.विठठलवाडा येथे अशोक हरियाणी यांनी जिनींगचे बांधकाम केले.पण हे काम करित असतांना त्यांनी ग्रामपंचायतीची परवानगी घेतली नाही.यानंतर ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे तक्रार केली.जिल्हाधिका-यांकडे प्रतिलीपी धाडण्यात आल्या.पण अजुनही याबाबत कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही.सोळा तारखेला तहसिल कार्यालयातून हरियाणी यांना बोलाविण्यात आले.पण ते त्यांनी यावेळेस दांडी मारली.यामुळे आता या मुददाला घेत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहेत.
गौरीनाथ अॅग्रो प्रायव्हेट लिमीटेडचे संचालक अशोक हरियाणी यांनी विठठलवाडा येथे जिनींगचे बांधकाम केले.बांधकाम करतांना ग्रामपंचायतीची पुर्वपरवानगी घेणे आवश्यक असतांना हरियाणी यांनी नियमांची एैसीतैसी करित जिनींगचे बांधकाम केले.या गंभीर प्रकाराची तक्रार ग्रामपंचायतीने तहसिलदारांकडे दाखल केली.गोंडपिपरी पोलीसांनाकडे तक्रार करण्यात आली.सोबतच जिल्हाधिका-यांनाही तक्रारीची प्रत देण्यात आली.दरम्यान याप्रकरणी प्रशासनाची दिरंगाई खूप काही सांगून जात असल्याचे मत आता तक्रारकर्ते व्यक्त करित आहेत.दरम्यान तहसिल कार्यालयामार्फत 16 डिसेंबर रोजी हरियांना यांना सुनावणीकरिता पाचारण करण्यात आले.ते या तारखेला आले नाहीत.दुसरी तारीख आज 30 डिसेंबर होती.ते या तारखेवर हजर झाले कि नाही हि माहिती प्रशासनाकडून देण्यात आली नाही. यामुळे याप्रकरणी हयगय होत असल्याचे समोर आले.नियमांची ऐसीतैसी करून जिनीगंचे बांधकाम करणा-यांवर प्रशासन कार्यवाही करणार का असा प्रश्न आता विचारला जात आहे.
खरेदीही सुरू..... कार्यवाही नाही..
विठठलवाडा येथे जिनींग काम करतांना कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही.एवढेच नव्हे तर काम पुर्ण झाले असून कापूस खरेदी देखिल सुरू झाली आहे.प्रशासनाच्या या लेटलतिफ कारभारावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
तो दलाल कोन....?
विठ्ठलवाडा येथे जिनिंग बांधण्यात आली.हरियाणी नामक व्यक्तीच्या मालकीची ती जिनिंग आहे. त्यांनी जिनिंग बांधकाम करतांना कुठलीही परवानगी घेतली नाही.या संपूर्ण कामात गोंडपिपरी येथील धान व्यापारी व एका बड्या पक्षाच्या नेत्याने दलाली ची भूमिका बजावल्याची माहिती आहे याच दलालाच्या मध्यस्थीने हे नियम बाह्य काम करण्यात आले
अवैध जिनंीग बांधकाम प्रकरणी कुठलीही हयगय केल्या जाणार नाही.सदर प्रकरणी चौकशी अहवाल तयार करून तो कार्यवाहीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे.
शुभम बाहकर,तहसिलदार,गोंडपिपरी.


0 टिप्पण्या